पुणे | Pune –
महाराष्ट्रात मुंबईनंतर पुणे शहर करोनाचं नवे हॉटस्पॉट बनले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात चाचण्या वाढवण्यात आल्यानं दररोज करोना रुग्णांची संख्याही वाढत असल्याचं दिसून येत आहे. शहरात आज दिवसभरात
40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1,781 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 90 हजार 871 वर पोहोचली आहे. coronavirus patient in pune
पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 1,781 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील रुग्णांचा आकडा 90 हजार 871 वर पोहोचला आहे. दुसरीकडे आज दिवसभरात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत 2 हजार 168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्या 1,578 रुग्णांना दिवसभरात घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत करोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांचा आकडा 73 हजार 527 रुग्ण इतका झाला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही माहिती देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये 1 हजार 48 रुग्ण
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 1 हजार 48 जण करोना बाधित रुग्ण आढळले असून, 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 246 जण आज करोनामुक्त झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 46 हजार 516 वर पोहोचली आहे. यात 32 हजार 109 जण करोनामुक्त झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात 5 हजार 644 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.




