Friday, May 3, 2024
Homeनगरराहाता तालुक्यात 184 पॉझिटिव्ह

राहाता तालुक्यात 184 पॉझिटिव्ह

राहाता (तालुका प्रतिनिधी) –

राहाता तालुक्यात दिवसभरात 184 रूग्ण पॉझिटिव्ह सापडले असून आतापर्यंत 93 जणांचा कोरोनाने बळी

- Advertisement -

गेला . राहाता ग्रामीण रूग्णालयात दिवसभरात 172 अँटीजन टेस्ट करण्यात आल्या. त्यात 45 जण पॉझीटीव्ह निघाले. राहाता, लोणी करोनाचे रूग्ण अधिक आहेत.

राहाता तालुक्यातील रूग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाही 24 तासात 184 जण कोरोना पॉझीटीव्ह सापडले असून त्यात लोणी बु 29, लोणी खु. 18, राहाता 25, कोल्हार बु 9, बाभळेश्वर 8, हसनापुर 6, प्रवरानगर 7, साकुरी 7, शिर्डी 8, पुणतांबा 4, ममदापुर 4, हणुमंतगांव 3, बाभळेश्वर 8, चितळी 3, दाढ 3, एलमवाडी 2, गोगलगांव 2, जळगांव 4, पिंपळस 2, निर्मळ पिंप्री 2, रांजनखोल 2, राजुरी 2, तसेच वाकडी, रूई, रांजणगांव, पाथरे, नांदुर, लोहगांव, कोर्‍हाळे, केलवड, कनकुरी, दुर्गापुर, चंद्रपुर, भगवतीपुर, अस्तगांव, आडगाव, या गावांत प्रत्येकी एक रूग्ण सापडला आहे. तर तालुक्यात आतापर्यंत 93 रूग्ण मयत झाले आहेत. तालुक्यातील सरकारी, साई संस्थान पिएमटी व सर्व खाजगी रूग्णालयात 1042 रूग्णांवर उपचार सुरू आहे.

सध्या उपचार घेत असलेल्या रूग्णांकडून ऑक्सीजन बेडची मागणी वाढत असल्याने प्रशासनाकडून धर्मशाळेत सुरू असलेल्या करोना सेंटर ऑक्शीजन बेडची क्षमता संपल्याने तसेच ऑक्सीजनचा तुटवडा भासत असल्याने शिर्डी संस्थानच्या सुपर स्पेशालीटी रूग्णालयातच करोना सेंटर सुरू करण्यात आले असून सुपर स्पेशालीटी रूग्णालयाचा स्वतःचा ऑक्सीजन प्लँट असल्याने तसेच पाच व्हँटीलेटरही यात उपलब्ध असल्याने यातच तातडीने 70 ऑक्सीजन बेड सुरू केले. अर्धे हॉस्पीटल त्यासाठी वापरले जाणार आहे. आणखी बेड वाढविण्याचे नियोज नअसल्याचे संबधीत अधिकार्‍यांनी सांगितले.

राहाता ग्रामीण रूग्णालयाला रविवारी अवघे 300 लसीचे डोस मिळाले होते. ते दिड दिवसातच संपल्याने काल दुपारपासून लस घेण्यासाठी आलेले रूग्ण रिकाम्या हाती परत गेले. नगर येथून अद्याप लस उपलब्ध न झाल्याचे उद्याच्या लसीकरणावरही प्रश्नचिन्ह दिसत आहे. दुसरीकडे राहाता तालुक्यात मोठ्या प्रमाणावर करोना रूग्ण वाढत असताना लस मिळत नसल्याने नागरीकांत संताप व्यक्त केला जात आहे. लस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी नागरीक करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या