Friday, May 3, 2024
Homeनगरश्रीरामपूर तालुक्यात 66 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 66 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) –

श्रीरामपूर तालुक्यात काल 66 रुग्ण सापडले आहे. तर 987 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत

- Advertisement -

आहेत. काल 09 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत.

जिल्हा रुग्णालयात 04 खासगी रुग्णालयात 17 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 45 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 09 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यात एकूण 987 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 3852 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 1776 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 987 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

श्रीरामपूर शहरात 17 रुग्ण असून तर तालुक्यात 44 व अन्य तालुक्यातील 5 रुग्ण आढळून आले आहेत.

शहरात वॉर्ड नं. 1-06, वॉर्ड नं. 3-03, वॉर्ड नं. 6-01, वॉर्ड नं. 7-07 से 17 तर ग्रामीण भागात उक्कलगाव-01, खंडाळा-01, गोंडेगाव-04, वळदगाव-04, ब्राम्हणगाव-01, उंदिरगाव-01, महांकाळवाडगाव-01, उंबरगाव-02, गुजरवाडी-01, टाकळीभान-01, खिडीर्र्-02, बेलापूर-05, शिरसगाव-01, दिघी-02, निमगाव खैरी-05, हरेगाव-05, गोंधवणी-0़5, रामपूर-01, फत्याबाद-01, नायगाव-01 असे एकूण 61 रुग्ण आहेत. तर अन्य तालुक्यातील आंबी-01, श्रीगोंदा तालुक्यातील खाणगा-01, तर अन्य तीन पत्ते माहित नसल्यामुळे श्रीरामपूरात वर्ग झालेले रुग्ण आहेत.

गेल्या आठवडाभरात करोनाने कहर केला होता. त्यावेळी शंभर दोनशेचे आकडे पार करुन करोना संसर्गाने कहर केला होता. काल मात्र केवळ 66 रुग्ण आढळून आल्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी थोडा मोकळा श्वास घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या