Friday, May 3, 2024
Homeनगरकरोना : नगर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.12 टक्के

करोना : नगर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 97.12 टक्के

अहमदनगर (प्रतिनिधी) –

जिल्ह्यात शुक्रवारी 95 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 70 हजार

- Advertisement -

4 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण (रिकव्हरी रेट) हे आता 97.12 टक्के इतके झाले आहे. दरम्यान शुक्रवारी रुग्ण संख्येत 93 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 979 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना लॅबमध्ये 21, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 66 आणि अँटीजेन चाचणीत 6 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 7, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 1, पारनेर 1, पाथर्डी 2, राहाता 2, संगमनेर 6 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीतील रुग्णांमध्ये मनपा 15, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 19, नेवासा 3, पारनेर 1, पाथर्डी 1, राहाता 9, राहुरी 1, संगमनेर 5, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 5 आणि इतर जिल्हा 3 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 6 जण बाधित आढळून आले. मनपा 1, जामखेड 2, नगर ग्रामीण 2, पाथर्डी 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या