Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशहोय करोना हरतोय! देशात सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट, आज किती रुग्णांची नोंद?

होय करोना हरतोय! देशात सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट, आज किती रुग्णांची नोंद?

दिल्ली l Delhi

संपूर्ण जगात करोनाचा (COVID19) शिरकाव झाल्यापासून करोनाने भारतातही कहर माजवला होता. जगात सर्वात जास्त रुग्ण असणाऱ्या काही देशात भारताचा समावेश होता.

- Advertisement -

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशात करोनाच्या (COVID19) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील २ लाखांपेक्षा कमी झाली आहे. (Corona active patient)

देशात गेल्या २४ तासांत १४ हजार १४६ रुग्णांची नोंद (Coronavirus news patient) करण्यात आली आहे. तर, १९ हजार ७८८ बाधित करोनातून बरे झाले असून १४४ जणांचा मृत्यू (COVID19 death) झाला आहे. या नवीन बाधितांसह देशातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ४० लाख ६७ हजार ७१९वर पोहोचली आहे.

एकूण बाधितांपैकी ३ कोटी ३४ लाख १९ हजार ७४९ रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून ४ लाख ५२ हजार १२४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या देशात १ लाख ९५ हजार ८४६ सक्रिय रुग्ण उपचाराधीन आहेत. ही गेल्या २२९ दिवसांतील सर्वात कमी सक्रिय रुग्णसंख्या आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९८.१० टक्क्यांवर आहे.

तसेच देशभरात करोनावर प्रतिबंधक लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. लवकरच भारत १०० कोटी डोसचा टप्पा गाठणार आहे. आतापर्यंत ९७ कोटी ६५ लाख ८९ हजार ५४० जणांना लस दिली आहे. गेल्या २४ तासात ४१ लाख २० हजार ७७२ जणांना लस देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती? (Corona update maharashtra)

राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट आता ओसरत आहे. दररोज आढळणारी नवीन करोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. शिवाय, करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. काल दिवसभरात राज्यात १ हजार ६८२ रूग्ण करोनामधून बरे झाले, तर १ हजार ५५३ नवीन करोनाबाधित आढळले. याचबरोबर, २६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख १६ हजार ९९८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या