Wednesday, November 11, 2026
Homeक्राईमCrime News : सात लाखांच्या बदल्यात 42 लाखांच्या बनावट नोटांचे आमिष

Crime News : सात लाखांच्या बदल्यात 42 लाखांच्या बनावट नोटांचे आमिष

व्यवहारासाठी आलेल्यांना मारहाण करून विळद परिसरात लुटले

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सात लाख रूपयांच्या खर्‍या चलनी नोटांच्या बदल्यात 42 लाख रूपयांच्या बाजारात चालणार्‍या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून सात लाख रूपये लुटले. तसेच रोकड घेऊन आलेल्या व्यक्तीस शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी राशिद नाजिम शेख (वय 28, रा. पुणे) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राणी नामदेव वारे (रा. पांघरी, ता. शिरूर, जि. बीड), शेटीबा बाबुराव कुर्‍हाडे (रा. धनगरवाडी, खामगाव, ता. नेवासा) तसेच राणी वारे हिच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादीनुसार, राशिद शेख यांचे नातेवाईक इम्रान इजाज शेख (रा. सोलापूर) यांचे उमेश मच्छिंद्र सुरवसे (रा. चिखलठाणा, केडगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्याशी परिचयाचे संबंध आहेत. सुमारे आठ दिवसांपूर्वी इम्रान आणि उमेश यांच्यात बनावट नोटांबाबत फोनवर चर्चा झाली. त्यावेळी उमेशने त्याच्या ओळखीच्या राणी वारे ही महिला बनावट नोटा देण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर इम्रान आणि राणी वारे यांच्यात फोनवरून संपर्क झाला. सात लाख रूपये दिल्यास त्याच्या बदल्यात 42 लाख रूपयांच्या बनावट नोटा देण्याचे ठरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानुसार 25 सप्टेंबर रोजी व्यवहार करण्यासाठी इम्रान शेख, उमेश सुरवसे, राणी वारे, तिच्यासोबतचे इसम, राशिद शेख आणि त्यांचा मित्र फैजल अन्सारी हे एकत्र आले होते. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास विळद सर्कल येथे राणी वारे व तिच्या साथीदारांनी फिर्यादी, इम्रान शेख व इतरांना लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे ठरलेला व्यवहार पूर्ण न करता सात लाख रूपयांची रोकड घेऊन संशयित आरोपी पळून गेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

सतेज

उद्ध्वस्त करतो, बघून घेतो अशा धमक्या माझ्याजवळ चालणार नाहीत; सतेज पाटलांचे...

0
कोल्हापूर | Kolhapurगोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करताना...