Friday, May 3, 2024
Homeजळगावजिल्ह्यातील 687 ग्रा.पं.निवडणुकीसाठी आज मतमोजणी

जिल्ह्यातील 687 ग्रा.पं.निवडणुकीसाठी आज मतमोजणी

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 92 ग्रा.पं.बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 687 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 5 हजार 255 सदस्यांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान घेण्यात आले होते.

- Advertisement -

जिल्ह्यातील 13 हजार 247 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. आता सोमवारी सकाळी 10वाजता जिल्ह्यातील पंधरा तहसील कार्यालयस्तरावर मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण झालेली आहे. दरम्यान, या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कोण पराभूत होणार याविषयी गावागावात चर्चा रंगू लागल्या असून निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

जळगाव जिल्हयात 687 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी 2415 मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले होते. यात 13 लाख 11हजार 847 मतदारांपैकी 10लाख 24हजार 683 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गत निवडणुकीत या मतदानाची टक्केवारी यापेक्षा कमी होती.

या निवडणुकीत आतापर्यंत जिल्ह्यात सर्वात जास्त 78.11 टक्के मतदान झाले आहे. जामनेर तालुक्यात 82.45 टक्के सर्वात जास्त मतदान झाले. रावेर 81.97, मुक्ताईनगर 81.81 चाळीसगांव 79.29 टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी सोमवारी प्रत्येक तालुकास्तरावर मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच मतमोजणीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

सर्वात जास्त चुरशीच्या समजल्या गेलेल्या या ग्रामपंचायतींच्या लढतीत मोठी स्पर्धा असून सोमवारी होणार्‍या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या