Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशCovid-19 : देशातील रुग्णसंखेने ६९ लाखांच्या टप्पा ओलांडला

Covid-19 : देशातील रुग्णसंखेने ६९ लाखांच्या टप्पा ओलांडला

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घसरण दिसली होती. परंतु आता पुन्हा एकदा ही संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात ७० हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

- Advertisement -

गेल्या २४ तासात ९६४ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ७० हजार ४९६ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ६९ लाख ०६ हजार १५१ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ५९ लाख ०६ हजार ०६९ रूग्ण करोनामुक्त झाले असून ८ लाख ९३ हजार ५९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत १ लाख ०६ हजार ४९० रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान काल महाराष्ट्रात १५ हजार५७५ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, यामुळे आज राज्यात आजपर्यंत एकूण १२ लाख १२ हजार ०१६ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१. १३ % एवढे झाले आहे. तर १३ हजार ३९५ नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज ३५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या