Friday, May 3, 2024
Homeनाशिकसावतानागर येथील कोविड सेंटरचे लोकार्पण

सावतानागर येथील कोविड सेंटरचे लोकार्पण

नवीन नाशिक । प्रतिनिधी

शिवसेनेचे लोकप्रतिनिधी करोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी स्वतः ला झोकून देत असून शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या संकल्पनेतून तसेच महापालिका आणि लोक सहभागातून साकार झालेले सावतानागर येथील सर्वसुविधांनी युक्त कोविड केअर सेंटर म्हणजे माणुसकीचे उत्तम उदाहरण असून सर्वानी त्याचा आदर्श घ्यावा,असे मत राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

नाशिक महानगरात करोना रुग्णांची वाढत असलेली संख्या लक्षात घेऊन गरजू रुग्णांना खाटा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची त्यासाठी होणारी परवड थांबावी या उद्देशाने शिवसेना महानगरप्रमुख बडगुजर यांनी पुढाकार घेऊन सावतानगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात (क्रॉम्प्टन हॉल) उभारलेल्या पहिल्या टप्प्यातील 65 खाटा असलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन कृषीमंत्री ना. दादा भुसे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

नवीन नाशकातील करोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. आणि त्यांना उपचारासाठी खाटा उपलब्ध होत नसल्याचे बघून महापालिका तसेच खाजगी डॉक्टर्स आणि लोकसहभागातून नवीन नाशकात दोन ठिकाणी कोविड सेंटर उभारावे आणि त्यादृष्टीने तातडीने पावले उचलल्यानंतर अवघ्या चार दिवसांत सावतानागर येथील 65 खाटांचे कोविड सेंटरचे लोकार्पण झाले बडगुजर यांनी सांगितले.

वीर सावरकर सभागृहात साकारलेल्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशा सुसज्ज करोना सेंटरमध्ये 45 खाटा ऑक्सिजनच्या असतील.तसेच रायगड चौकातील बाळासाहेब ठाकरे विद्या प्रबोधिनी या मनपाच्या शाळेत 100 खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात येणार असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे,असेही बडगुजर यांनी सांगितले.

सावतानागर येथील रुग्णांच्या सेवेसाठी निष्णात डॉक्टरांचा फौजफाटा नेमण्यात आला आहे . त्यासोबत मोठ्या प्रमाणात कर्मचारी व स्वयंसेवक असणार आहेत . नवीन नाशकातील डॉ. किरण बिरारी, डॉ. तुषार शिंदे, डॉ. भुषण कुलकर्णी, डॉ. छाया गाढवे, डॉ. त्रिवेंद्र शिंदे आदी खाजगी डॉक्टर्स तसेच काही परिचारिकांनी या कार्यात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी माजी मंत्री बबन घोलप, शिवसेना जिल्हाप्रमुख आ.विजय करंजकर, खा. हेमंत गोडसे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, मनपा गटनेते विलास शिंदे, युवासेना जिल्हा अधिकारी राहुल ताजनपुरे, बाबा गायकवाड, माजी महानगरप्रमुख देवानंद बिरारी, महानगर संघटक दिगंबर मोगरे, योगेश बेलदार, नगरसेवक श्यामकुमार साबळे, संतोष गायकवाड, भागवत आरोटे, रत्नमाला राणे, हर्षदा बडगुजर, किरण गामणे, संगीता जाधव, उपमहानगरप्रमुख देवा जाधव, सुनील जाधव, वैभव खैरे, अजय चौगुले, अमोल सूर्यवंशी, सचिन बांडे,शिवसेना पदाधिकारी रमेश उघडे, गोकुळ नगर, सागर करपे, उमेश चव्हाण, सुभाष गायधनी, विरेंद्रसिंग टीळे, कमलेश परदेशी, पवन मटाले, गोकुळ तिडके, शिवा ताकाटे, बबलू सूर्यवंशी, बाळा दराडे,सुरेश पाटील,शिवसेना नाशिकजिल्हा कार्यालयप्रमुख राजेंद्र वाकसरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या