Friday, September 4, 2026
Homeदेश विदेशसुटीच्या दिवशीही मिळेल करोना प्रतिबंधक लस

सुटीच्या दिवशीही मिळेल करोना प्रतिबंधक लस

नवी दिल्ली –

- Advertisement -

सर्व शासकीय आणि खासगी करोना लसीकरण केंद्रावर सुटीच्या दिवशीही करोना प्रतिबंधक लस देण्यात येणार

आहे. एप्रिल महिन्यामध्ये कालावधीत लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेनुसार देशभरात 45 वर्षांपुढील सर्वांसाठी आजपासून लसीकरण सुरू झाले आहे.

आतापर्यंत करोनायोद्धे, सहव्याधी असलेल्या 45 वर्षांपुढील व्यक्ती तसेच 60 वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण केले जात होतं. आता मध्यमवयीन व्यक्ती करोना बाधित होण्याचे प्रमाण प्रचंड असल्याने लसीकरणाचा विस्तार करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता.

वाढत्या लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या लशींचा राज्यांना पुरेसा आणि वेळेवर पुरवठा केला जाईल, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. लसीकरणाचा वेग वाढला तरी लशीचा तुटवडा निर्माण होऊ दिला जाणार नाही. राज्यांनी लसीकरणाची अद्ययावत आकडेवारी केंद्राला देेणे गरजेचे असून, त्यानुसार लशींचा पुरवठा केला जाईल, असेही केंद्राने सांगितले आहे.

ताज्या बातम्या

Nashik ZP News : जिल्हा परिषदेचे सन २०२६ चे गुणवंत शिक्षक...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने नाशिक जिल्हा परिषदेच्यावतीने...