Sunday, September 27, 2026
Homeक्राईमNashik News : आश्रमशाळेच्या आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; कारण अस्पष्ट, चौकशीची मागणी

Nashik News : आश्रमशाळेच्या आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; कारण अस्पष्ट, चौकशीची मागणी

नाशिकमधील 'या' तालुक्यातील घटना

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील (Kalwan Taluka) विसरवाडी (Visarwadi) येथील शासकीय आश्रमशाळेत (Ashram School) शिकणाऱ्या सृष्टी ओंकार सूर्यवंशी (वय ८) या विद्यार्थिनीचा शुक्रवारी (दि. ४) पहाटे उपचारादरम्यान मृत्यू (Death) झाला. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व वैद्यकीय सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टीची शुक्रवारी रात्री सुमारे १.३० वाजता प्रकृती अचानक खालावली. तिला तातडीने कळवण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच पहाटे सुमारे २.२० वाजता तिचा मृत्यू झाला. सृष्टीचे पार्थिव पुढील वैद्यकीय तपासणी व शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची (Girl Student) अचानक प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याने पालक व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळतात का? आश्रमशाळेत आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध आहेत का? तसेच सृष्टीची प्रकृती खालावल्यानंतर तिला उपचारासाठी नेण्यात किती वेळ लागला, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. या घटनेची प्रशासनाने सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...