Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशCorona Update : भारतात दिवसाचा पॉझिटिव्हीटी रेट ११९.६५ टक्क्यांवर, पण...

Corona Update : भारतात दिवसाचा पॉझिटिव्हीटी रेट ११९.६५ टक्क्यांवर, पण…

दिल्ली | Delhi

भारतात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांचा (corona update india) आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला अडीच लाखांवर करोनाबाधित (new covid cases) सापडत आहेत. यातच आज दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर ‘प्रियांका चोप्रा’च्या भन्नाट लुकची चर्चा, पाहा PHOTOS

भारतात गेल्या २४ तासात २ लाख ५८ हजार ८९ करोना बाधितांची नोंद (Indian Corona Cases toaday) झाली आहे. कालच्या तुलनेत १३ हजार ११३ ने रुग्ण कमी झाले आहेत. तर, ३८५ जणांचा करोनामुळे मृत्यू (corona death) झाला आहे. त्यासोबतच १ लाख ५१ हजार ७४० रुग्ण बरे झाले आहेत.

करोनाच्या नवीन रुग्णांसह देशातील एकूण सक्रिय रुग्णांची (coronavirus active patient) संख्या आता १६ लाख ५६ हजार ३४१ वर पोहोचली आहे. करोनामुळे आतापर्यंत ४ लाख ८६ हजार ४५१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील ओमिक्रॉन बाधितांची एकूण रुग्णांची संख्या ८ हजार २०९ इतकी झाली आहे.

Sonalee Kulkarni : अप्सरेचा अनोखा अंदाज, चाहत्यांना लावले वेड

महाराष्ट्रातील स्थिती काय? (maharshtra corona update)

राज्यात रविवारी ४१ हजार ३२७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४० हजार ३८६ रुग्ण करोनातून मुक्त झाले आहेत. तर राज्यात रविवारी ८ ओमिक्रॉनबाधितांची नोंद झालीय. महाराष्ट्रातील एकूण ओमिक्रॉन रुग्णांचा आकडा १ हजार ७३८ वर पोहोचला आहे. त्यातले ९३२ रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत.

PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

- Advertisment -

ताज्या बातम्या