Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशकोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवले, आता इतक्या आठवड्यांनी घ्या दुसरा डोस

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवले, आता इतक्या आठवड्यांनी घ्या दुसरा डोस

नवी दिल्ली

सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड (Covishiled) या लसींचे दोन डोसमधील आंतर आता तिसऱ्यांदा वाढवण्यात आले आहे. पहिल्यांदा जेव्हा ही लस दिली तेव्हा २८ दिवसांचे म्हणजे ४ आठवड्यांचे अंतर होते. दुसऱ्यांदा त्यात वाढ करुन ६ ते ८ आठवडे करण्यात आले होते. आता तिसऱ्यांदा १२ ते १६ आठवड्यांपर्यंत करण्यात आले आहे. म्हणजेच तुम्ही कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस १२ ते १६ आठवड्यांनी घ्यावा लागणार आहे. हा नियम फक्त कोविशिल्ड (Covishiled) कोरोना लशीसाठीच लागू असेल.

- Advertisement -

पुढील आठवड्यात भारतात मिळणार Sputnik V

सीरम इ्नस्टि्यूटच्या कोविशिल्ड कोरोना लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवावे अशी शिफारस सरकारच्या नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोव्हिड १९ या समितीने केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शिफारस मान्य केली आहे.

भारतात आपत्कालीन वापरासाठी दोन कोरोना लस मंजूर झाल्या आहेत. एक आहे भारत बायोटेकची कोवाक्सिन आहे आणि दुसरी म्हणजे अ‍ॅस्ट्रोजेनिका आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड. भारतात सुरू असलेल्या लसीकरणात या दोन्ही लस सध्या दिल्या जात आहेत.

अखेरी राज्यातील लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवला

- Advertisment -

ताज्या बातम्या