Thursday, May 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक मधील सीपीआरआय लॅबचे उद्या उदघाटन

नाशिक मधील सीपीआरआय लॅबचे उद्या उदघाटन

केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिकसह पश्चिम भारतातील इलेक्ट्रिक हबला वरदान ठरणार्‍या २१६ कोटी रुपये खर्चून शिलापूर, नाशिक येथे साकारलेल्या बहुप्रतिक्षित सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (सीपीआरआय) लॅबचे उद्घाटन उद्या बुधवार दि. १० सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजता केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते संपन्न होत आहे,

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषधे प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे तसेच जिल्ह्यातील सर्व खासदार,आमदार उपस्थित राहणार आहे.

नाशिकच्या औद्योगिक नगरीसाठी आज सोनियाचा दिवस आहे कारण विद्युत मंत्रालयाने उभारलेल्या या सीपीआरआय लॅबमुळे १० एमव्हीएमपर्यंतचे परीक्षण आता नाशिकला होणार असल्याने नाशिककरांना इतरत्र जाण्याची त्यामुळे गरज भासणार नाही. स्मार्ट ऊर्जा मीटर परीक्षणही आता येथे शक्य होणार आहे. ८०० केव्ही उच्च व्होल्टेज परीक्षण सुविधा या लॅबमध्ये उपलब्ध असेल,असे निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...