Monday, September 7, 2026
HomeनगरCrime News : पतसंस्थेकडून सात लाखांची फसवणूक

Crime News : पतसंस्थेकडून सात लाखांची फसवणूक

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जास्त व्याजदराचे आमिष दाखवून एका दाम्पत्याकडून 6 लाख रुपयांची मुदत ठेव स्वीकारल्यानंतर मुदत पूर्ण होऊनही रक्कम व व्याज परत न देता तब्बल 7 लाख 27 हजार 260 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनसह सात जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरूडे मळा, सावेडी येथे राहणार्‍या महिलेने फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाईपलाईन रोड परिसरातील राजस्थानी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेत आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक मेळाव्यात ठेवीवर 12.12 टक्के आकर्षक व्याजदर देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून फिर्यादी महिला आणि त्यांच्या पतीने कष्टाने साठवलेली 6 लाख रुपयांची रक्कम मुदत ठेव स्वरूपात पतसंस्थेत गुंतवली.मुदत ठेव पूर्ण झाल्यानंतर फिर्यादीने वारंवार पतसंस्थेकडे मूळ रक्कम आणि व्याजाची मागणी केली. मात्र, संबंधितांनी विविध कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर मुदत संपल्यानंतर देय असलेली 7 लाख 27 हजार 260 रुपयांची रक्कमही न देता फिर्यादीची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, पैसे परत मिळावेत म्हणून फिर्यादीने परळी वैजनाथ येथील पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात तसेच चेअरमनच्या निवासस्थानी जाऊन पाठपुरावा केला. मात्र, तेथेही रक्कम परत न देता त्यांना गुंडांमार्फत हुसकावून लावण्यात आले तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चेअरमन चंदुलाल बिहाणी, पूजा बिहाणी, शाखाधिकारी मिथुन गांधी, कॅशियर रुक्मिणी साळुंके, लेखनिक तृप्ती गोंगे, कर्मचारी अर्जुन वाव्हळे, वैभव नावडकर यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीसह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

धनंजय

Dhananjay Munde: ‘काटे खोलवर रुतले आहेत, तरी पाऊल पुढे टाकतो आहे…धनंजय...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असलेल्या धनंजय मुंडे...