Saturday, November 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजगद्दारांची मांदियाळी असताना...; डिलिमीटेशनच्या पाठिंब्यावरुन काँग्रेसचा शरद पवार, सुळेंना टोला

गद्दारांची मांदियाळी असताना…; डिलिमीटेशनच्या पाठिंब्यावरुन काँग्रेसचा शरद पवार, सुळेंना टोला

मुंबई | Mumbai
डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील राजकारण तापले आहे. सोमवारी (30 नोव्हेंबर 2026) संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होणार आहे. यात 30 नोव्हेंबरला लोकसभेचे तर 2 डिसेंबरला राज्यसभेचे कामकाज चालणार आहे. तत्पूर्वी शुक्रवारी (27 नोव्हेंबर 2026) केंद्रीय मंत्रिमंडळाने डिमिलिटेशनला मंजुरी देत लोकसभेच्या 50 टक्के जागा वाढवणे तसेच पुढील 25 वर्षांसाठी डिलिमिटेशन प्रक्रिया गोठवण्याला मंजुरी दिली आहे. यावरुन आता मोठे राजकारण सुरु झाले आहे.

भाजपप्रणित एनडीएने पावसाळी अधिवेशनात डिलिमटेशन विधेयक (delimitation bill) मांडले होते तेव्हा विरोधकांनी एकजुटीने ते हाणून पाडले होते. मात्र, आता याच मुद्द्यावरुन अनेक राजकिय घडामोडी घडत आहे. शुक्रवारी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पवार गटाचा डिलिमिटेशनाला पाठिंबा असल्याची भूमिका जाहीर केल्यामुळे इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला असून इंडिया आघाडीत फुट पडण्याची शक्यता असल्याच्या चर्चा होत आहे. यामुळे काँग्रेसची शरद पवारांवर प्रचंड नाराजी आहे आणि ही नाराजी काँग्रेसने X या समाज माध्यमावरून पोस्ट करून व्यक्त केली आहे.

शरद पवार साहेबांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता…

मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली.

आणि आता काय?

परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रीया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत.— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 27, 2026

- Advertisement -

गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी शरद पवार साहेबांना भक्कम आधार दिला
महाराष्ट्र काँग्रेसने ‘एक्स’वर पोस्ट करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसने म्हटलं की, शरद पवार साहेबांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता…मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढे वेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली.

संपादकीय : २८ नोव्हेंबर २०२६ – साखर कारखानदारीचा डोलारा कोसळतोय!

‘काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली. परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रीया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत, अशा शब्दात काँग्रेसने सुनावलं. तसेच काँग्रेसने एक इमोशनल व्हिडिओ पोस्ट करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदतीची आठवून करून दिली आहे. ‘गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी शरद पवार साहेबांना भक्कम आधार दिला होता, अशा शब्दात काँग्रेसने राष्ट्रवादीला मदतीची आठवून करून दिली आहे.

ताज्या बातम्या

रोहित

Rohit Pawar: तेंव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो, आजही...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या डिलिमिटेशन विधेयकावरील भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पवारांच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याचे बोलले...