Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारअक्कलकुवा येथे रास्ता रोको केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुखांसह 30 जणांविरुद्ध गुन्हा

अक्कलकुवा येथे रास्ता रोको केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुखांसह 30 जणांविरुद्ध गुन्हा

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

अक्कलकुवा (Akkalkuwa) येथे विना परवानगी (Without permission) रास्ता रोको (Stop the way) आंदोलन केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुखांसह (Shiv Sena district chief) 30 जणांविरूध्द गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा प्रकल्प कार्यालयाअंतर्गत काम करणार्‍या सर्व वर्ग 3 वर्ग 4 रोजंदारी मानधन कर्मचारी यांचे विविध मागण्यासाठी दि.24 नोव्हेंबर रोजी अक्कलकुवा तहसिल कार्यालयासमोरील अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावर शिवसेनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

परवानगी न घेता करुन रास्ता रोको आंदोलन करुन रहदारीस अडथळा निर्माण करुन कोरोना संदर्भातील कोणत्याही अटीचे पालन न करता जिल्हाधिकार्‍यांच्या जमावबंदी आदेशाचे व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या फुलजी पाडवी, किरण इच्छाराम भावसार रा. लोहारगल्ली, अक्कलकुवा, ललितकुमार जगदीश जाट रा.खापर, निदानसिंग जालमसिंग सिकलीकर रा.शिखफळी, दिपक तुळशीराम मराठे रा.परदेशी गल्ली, नासिरयार मोहमंद बलोच रा. मक्राणीफळी, सलाउद्यीन समोउद्यीन हाश्मी रा.अक्कलकुवा, हबीब सत्तार रा.अब्दुल मक्राणीफळी, सचेंद्रसिंग उर्फ गोलु मोहनसिंग चंदेल रा.लोहार गाडी व इतर 25 ते 30 अनोळखी स्त्री पुरुषांविरूध्द भादवि कलम 188, 269,341, 270,म.पो.का.क.37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोना खुशाल माळी यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोसई अशोक काळे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या