Tuesday, March 25, 2025
HomeUncategorizedमालाचे पैसे न देता व्यावसायिकाची 75 लाखांची फसवणूक

मालाचे पैसे न देता व्यावसायिकाची 75 लाखांची फसवणूक

अहमदनगर । प्रतिनिधी

कंपनीतून पाठविलेल्या प्लायवुड आणि पार्टीकल बोर्डच्या व्यवहाराचे 75 लाख 44 हजार रूपये न देता येथील एका व्यावसायिकाची मुंबईच्या दोघा व्यावसायिकांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. सुरेंद्र मोतीलाल लोढा (वय 64, रा. माणिकनगर, आनंदऋषी हॉस्पिटलच्या मागे, नगर) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

- Advertisement -

या प्रकरणी त्यांनी गुरूवारी (8 ऑगस्ट) सायंकाळी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिकिसन भट्टड, ब्रिजेश भट्टड (पूर्ण नावे नाही, दोघे रा. 104 बालाजी भवन, नरिमन पॉईंट, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. लोढा यांची नगर एमआयडीसीत एस. मोतीलाल इंडस्ट्रीज नावाची कंपनी असून यामध्ये प्लायवुड आणि पार्टीकल बोर्ड तयार केले जातात.

हे ही वाचा : दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने तो दुचाकींची चोरी करायचा

या कंपनीचे सर्व व्यवहार लोढा यांच्या एस. मोतीलाल प्लायवुड हाऊस, टीन गल्ली, गंजबाजार, नगर येथील कार्यालयातून चालतात. या कार्यालयात 2 मार्च 2020 रोजी आर. एम. बी. इव्हेंट मॅनेजमेंन्ट प्रा. ली. 104, बजाज भवन, नरीमन पॉईंट, मुंबई या फर्मचे हरिकसन भट्टड व ब्रिजेश भट्टड आले होते. त्यांनी लोढा यांच्याकडे प्लायवुड, पार्टीकल बोर्ड, एम. डी. एफ. बोर्डची मागणी केली.

त्यांच्या मागणीनुसार लोढा यांनी वेळोवेळी एक कोटी 93 लाख 34 हजार 525 रूपये, चार कोटी नऊ लाख 34 हजार 525 रूपये किंमतीचा माल दिला होता. त्या मालाचे पैसेही लोढा यांना मिळाले होते. तसेच त्यानंतर दोन कोटी चार लाख 34 हजार 525 रूपयांचा माल दिला होता. त्याचे एक कोटी 60 लाख रूपये मिळाले होते तर 44 लाख 34 हजार 525 रूपये बाकी होते.

हे ही वाचा : शिर्डी विमानतळास जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट

1 एप्रिल 2022 रोजी हरिकिसन भट्टड व ब्रिजेश भट्टड यांनी लोढा यांच्याकडून 31 लाख नऊ हजार 476 रूपये किंमतीचा माल खरेदी केला होता. यापूर्वी दिलेल्या मालाचे 44 लाख 34 हजार 525 व नंतर दिलेल्या मालाचे 31 लाख नऊ हजार 476 रूपये असे एकुण 75 लाख 44 हजार एक रूपये भट्टड यांच्याकडे बाकी राहिले होते.

सदर बाकी राहिलेले पैसे लोढा यांनी मागितले असता आमची कंपनी सध्या अडचणीत आहे, असे वारंवार सांगून भट्टड यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लोढा यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे अर्ज दाखल केला.

हे ही वाचा : बसने रस्ता न दिल्याने चालक वाहकाला मारहाण

सदरचा अर्ज चौकशीसाठी कोतवाली पोलिसांकडे आला होता. या अर्जाची चौकशी करून पोलिसांनी गुरूवार, 8 ऑगस्ट 2024 रोजी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...