Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime : नराधम अशोक खरातच्या अडचणीत वाढ; आता 'या' तारखेपर्यंत...

Ashok Kharat Crime : नराधम अशोक खरातच्या अडचणीत वाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

नाशिक | Nashik

महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नाशिक गुन्हे शाखेने भोंदू कॅप्टन अशोक खरातला दि.१८ मार्च रोजी अटक केली. त्यानंतर त्याला दि.२४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज (मंगळवारी) त्याची कोठडी संपत असल्याने त्याला नाशिक सत्र न्यायालयात (Nashik Court) दुपारी ३. ५० वाजता हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील आणि खरातच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. यावेळी पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानंतर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

- Advertisement -

नाशिक सत्र न्यायालयाने अशोक खरातला पाच दिवसांची म्हणजेच दि.२९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली. यावेळी न्यायालयात सरकारी वकिलांनी आरोपी खरात लोकांना खडे द्यायचा, पेढा खाऊ घालायचा पाणी प्यायला द्यायच आणि त्यानंतर मळमळ व्हायची. त्यामुळे पेढा, पाणी कुठून आणायचा त्याचा शोध घ्यायचा आहे.तसेच त्याच्या फार्म हाऊसमध्ये पिस्तुलच्या पाच रिकाम्या पुंगळ्या सापडल्या असून ते कुठे फायर केले ते बघायचे आहे. त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी करण्यात आली. परंतू, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, खरातला न्यायालयात (Court) आणण्यापूर्वी त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाच्या संवेदनशीलतेमुळे न्यायालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले होते. तर सुनावणी पाहण्यासाठी वकिलांचीही मोठी गर्दी झाली होती. तसेच समाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी आपल्या समर्थकांसह न्यायालयात दाखल झाल्याने काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : दानपेट्या फाेडणारा गजाआड; दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत,...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरातील विविध मंदिरांमधील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला (Criminal) गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक (Arrested) केली आहे....