Friday, May 3, 2024
Homeनगरवाहन चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

वाहन चोरणारी आंतरराज्य टोळी जेरबंद

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

विक्री केलेल्या महागड्या वाहनांवर जीपीएसच्या सहाय्याने पाळत ठेऊन चोरी करणार्‍या आंतरराज्य टोळीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. तरबेज शेख (रा. कोंडवा खुर्द, पुणे), सफराज शेख (रा. मंगळवार पेठ जि. पुणे), अभिजित सचिन कदम (रा. हातपूरा, नगर), मोहम्मदअली रईस शेख (रा. पंचपीर चावडी, नगर), दानिश हुसेन शेख (रा. रविवार पेठ, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. त्यांच्याकडून चोरी केलेल्या वाहनांसह 39 लाख, 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

गणेश संपत लावरे यांनी 14 फेब्रुवारी रोजी नोटरी करून फोर्च्युनर वाहन (क्र. एम एच 12 पीसी 1221) खरेदी केले होते. 19 जूलै रोजी दुपारी बारा वाजता लावरे यांनी त्यांची फोर्च्युनर क्लेअराब्रस मैदानावर पार्क केली होती. या ठिकाणाहून ही फोर्च्युनर चोरीला गेली होती.

याप्रकरणी लावरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतिष शिरसाठ यांच्या पथकाने सुरु केला.

फिर्यादी यांनी दिलेल्या नावावरून व प्राप्त सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन पुणे येथे अटक केली. पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले, अँन्थोनी ऊर्फ टोणी दास अर्कस्वामी (रा. हैद्राबाद) याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गहाण ठेवलेल्या चारचाकी वाहनांची विक्री करून रोख पैसे प्राप्त करून घेतो.

वाहन विक्री वेळी नोटरी करून दिली जाते. ग्राहकाला ड्युप्लीकेट चावी देऊन ओरिजनल चावी आम्ही स्वतः कडे ठेवत असे. विक्री केलेल्या वाहनांना जीपीएस असल्याने त्या आधारे पाळत ठेऊन ओरिजनल चावीचा वापर करून चोरी करत असल्याचे कबूली आरोपींनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या