Tuesday, September 15, 2026
Homeक्राईमDindori Crime News : खडी क्रेशरमधून कॉपर चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद;...

Dindori Crime News : खडी क्रेशरमधून कॉपर चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद; दिंडोरी पोलिसांची कामगिरी

दोघे ताब्यात, चोरीचा मुद्देमाल व वाहन जप्त

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

पेठ रोडवरील (Peth Road) गवळवाडी शिवारातील आर.एम.सी. प्लांट, डांबर प्लांट आणि खडी क्रेशरमधून सुमारे २ लाख २७ हजार रुपयांच्या कॉपर केबल व डी.पी.मधील कॉपर प्लेटा लांबवणाऱ्या सराईत टोळीचा दिंडोरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. नाशिक रोड परिसरातून (Nashik Road Area) दोन अट्टल चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले असून, चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

दुधाच्या कॅरेटचा आडोसा अन् चोरीचा बनाव

२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री गवळवाडी शिवारातील (Gavalwadi Area) प्लांटमधून कॉपरच्या केबल व प्लेटा चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांच्या माहितीवरून तपास करत संशयितांचा शोध घेतला. तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी जेल रोड (नाशिक रोड) परिसरातून इरशाद नहीम शेख (वय ३२) आणि रहेमान फजल शेख (वय ३९) या दोघांना ताब्यात घेतले. आरोपी रात्रीच्या वेळी स्विफ्ट डिझायर कार आणि अशोक लेलँड मालवाहू गाडी घेऊन चोरीसाठी निघायचे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मालवाहू गाडीत मागे दुधाचे कॅरेट ठेवले जात होते.

सराईत गुन्हेगारांचा शोध सुरू

ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी सराईत (Criminal) गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील इतर फरार साथीदारांचा पोलीस कसून शोध घेत असून, त्यांच्या अटकेनंतर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही यशस्वी कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर पोलीस अधीक्षक एम. विमला आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मदेव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, सपोनि सोपान राखोंडे व त्यांच्या पथकाने केली.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मंगळवारी कांद्याची (Onion) राहाता...