चाळीसगाव | Chalisgaon
शहरातील नॅशनल ऊर्दू हायस्कुलच्या (National Urdu High School) आठ शिक्षकांनी (Teachers ) शासनाचे आदेश नसतांना, १०० टक्के शासन अनुदान निर्णय झाल्याबाबतच्या आदेशाची खोटी प्रत तयार करुन मुख्याध्यापक यांच्याकडे सादर केली. तसेच त्यांच्याकडून पगार अनुदानाचे बिले तयार करून ते खोटे आहेत हे माहीत असतांना सुध्दा मुख्याध्यापक सलीम खान लाल खान रा. चाळीसगांव यांनी देखील कोणतीही खात्री न करता त्या पगार बिलावर सह्या करुन ते शासनास सादर करून शासनाच्या अकरा लाख सत्तेचाळीस हजार दोनशे सदोत्तीस रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणुक केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला (Chalisgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गटशिक्षणाधिकारी विलास आनंदा भोई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगांव शहरातील (Chalisgaon City) नॅशनल ऊर्दू हायस्कुल ही शासन मान्य शाळा असुन सदर शाळेत इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी पावेतो वर्ग आहेत. सदर शाळेत काही शिक्षक १०० टक्के अनुदानित असुन खान वसीम अहमद मोहम्मद नूर खान, शेख शफी शेख हसन, मोहम्मद शहेजाद खान साहेब खान, शिफा नाज सैय्यद अशफांक, निकहत जहा साहेब खान कुरेशी, सैय्यद अतीक सैय्यद मजहर, मोहम्मद इफान शेख अन्सार,अब्दुल मतीन मोहम्मद हनीफ यांना शासना तर्फे २० टक्के पगार अनुदान मंजुर आहे.
नमुद शिक्षकांचे पगार (Salary) हे शाळेच्या प्रशासन विभागामार्फत बिले तयार करुन मुख्याध्यापकाच्या सहीने जिल्हा शिक्षण विभाग यांचे कडेस पाठविले जाते. मुख्याध्यापक म्हणून सलीम खान लाल खान हे आहेत. या सर्वांनी आपसांत संगनमताने त्यांचे पगार २० टक्के शासन अनुदानीत असतांना ते १०० टक्के शासन अनुदान निर्णय झाल्याचे शासनाच्या आदेशाची खोटी प्रत सादर करुन १०० टक्के पगार बिले तयार करून सदर पगार बिलावर मुख्याध्यापक सलीम खान लाल खान यांनी स्वाक्षरी करून ते जिल्हा शिक्षण विभाग, जळगांव यांचेकड़े माहे जानेवारी-फेब्रुवारी २०२५ या महिन्याधी खाली प्रमाणे शासनाच्या रकमेचा अपहार करून फसवणुक केली आहे.
दरम्यान, १०० टक्के शासन अनुदान निर्णय झाल्याबाबतचे शासनाच्या (Government) आदेशावी खोटी प्रत तयार ते खोटे आहेत हे माहीत असतांना सुध्दा मुख्याध्यापक सलीम खान लाल खान यांनी देखील कोणतीही खात्री नकरता त्या पगार बिलावर सह्या करुन ते शासनास सादर करून शासनाच्या ११,४७,२३७/-रुपयांच अपहार करून शासनाची फसवणुक (Fraud) केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




