Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCrime News : वृद्ध महिलेचा खून; अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरु

Crime News : वृद्ध महिलेचा खून; अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरु

वणी | वार्ताहर Vani

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथे एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून,अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान वणी पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंदाकिनी हरिभाऊ सोनवणे (वय ७०, रा.लखमापूर,ता. दिंडोरी) या महिलेचा मृतदेह ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी लखमापूर गावातील घराजवळील तळ्यात आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार,अज्ञात व्यक्तीने वृद्ध महिलेच्या तोंडावर कापडाने बांधून,तिचे हात-पाय बांधून तिला घराजवळील तळ्यात टाकल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २४४/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली. उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मदेव शेलके तसेच सहायक पोलिस निरीक्षक हेमंत फड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून,आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध शक्यता तपासल्या जात आहेत.

वृद्ध महिलेचा नेमका कोणत्या कारणातून खून करण्यात आला,या घटनेमागे कोणाचा हात आहे आणि आरोपीने हा प्रकार का केला,याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. सदर महिला घरात एकटीच वास्तव्यास होती, वणी पोलिसांसमोर अज्ञात मारेकऱ्याचा शोध घेऊन या खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.या घटनेमुळे लखमापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,पोलिसांनी आरोपीला तातडीने जेरबंद करून खुनामागील सत्य उजेडात आणावे,अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...