चाळीसगाव | मनोहर कांडेकर
दिल्लीहून – छत्रपती संभाजी नगर कडे जाणाऱ्या कोटी रुपयांचा एमडी ड्रग्सने भरलेले वाहन चाळीसगाव-कन्नड रस्त्यावर कन्नड घाटाच्या पायथ्याशी, रात्री चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई करून जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. या वाहनात तब्बल ६० कोटीचा नशेचा पदार्थ एमडी ड्रग्स सापडला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एक कार एमडी ड्रग्स घेऊन दिल्लीहून -छत्रपती संभाजी नगर कडे जात असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव पोलिसांनी मिळाली, पोलिसांच्या पथकाने कन्नड घाटाच्या पायथ्याशी सापळा लावून, या वाहनाला थांबवले असता, यात जवळपास ६० कोटी लाखो रुपयांचा नशेचा अमली पदार्थ ड्रग्स असल्याची माहिती वाहन चालकाने पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, वरिष्ठ पोलिसांनी लागलीच रात्री घटनास्थळी धाव घेतली, याबाबत ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत सर्वात मोठी कारवाई असल्यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे विधिमंडळात सुद्धा पडसाद उमटण्याची शक्यता आहे.




