Monday, April 6, 2026
Homeक्राईमNashik Crime : डेटिंग ॲपवर करण्यात आला लव्ह ट्रॅप; दोन सायबर गुन्ह्यांत...

Nashik Crime : डेटिंग ॲपवर करण्यात आला लव्ह ट्रॅप; दोन सायबर गुन्ह्यांत नाशिककरांचे ३ कोटी स्वाहा

शेअर मार्केटच्या नावाखालीही डल्ला

नाशिक | Nashik

मोबाईलमधील (Mobile) बंबल डेटिंग ॲपवर (Deting App) झालेली ओळख, त्यानंतर रंगलेले चॅटिंग आणि यूएसईमध्ये नोकरी करत असल्याचे सांगून एका बड्या व्यावसायिकाला तरुणीने या व्यावसायिकाला तररूणीने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तब्बल ४८ लाख ५५ हजार रुपयांना गंडवले. दरम्यान, दुसऱ्या एका शेअर मार्केटच्या गुन्ह्यात तिघांना २ कोटी ४३ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. अवघ्या दोन गुन्ह्यांत नाशिककरांचे २ कोटी ९१ लाख ६० हजार रुपये उकळण्यात आल्याने खळबळ माजली आहे.

- Advertisement -

कॉलेज रोडवरील (Collage Road) व्यावसायिकाने एकाकीपणा दूर करण्यासाठी बंबल डेटिंग अॅपवर अकाऊंट उघडले. तिथे त्याची ओळख तानिया शर्मा नावाच्या तरुणी शी झाली. ओळखीचे रूपांतर लवकरच मैत्रीत आणि पुढे प्रेमात झाले. दोघेही व्हॉट्सअॅपवर तासनतास चॅटिंग करू लागले. तानियाने आपण यूएई येथील सेंच्युरी मार्केट कंपनीत काम करत असल्याचे भासवले. ङ्गङ्गमी फॉरेक्स ट्रेडिंग, गोल्ड आणि सिल्व्हर मार्केटमध्ये मोठी कमाई करते, तुम्हीही गुंतवणूक करा, असे सांगून तिने त्याला जाळ्यात ओढले.

प्रेमात (Love) आकंठ बुडालेल्या या व्यावसायिकाने तानियाच्या शब्दावर भोळा विश्वास ठेवून तिने पाठवलेल्या बनावट लिंकवर गुंतवणूक सुरू केली. सुरुवातीला नफा होत असल्याचे आभासी चित्र दाखवून तानियाने टप्प्याटप्प्याने ४८ लाख ५५ हजार रुपये उकळले. मात्र, जेव्हा पैसे काढण्याची वेळ आली, तेव्हा तानियासह त्या सर्व वेबसाईट्स गायब झाल्या. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाणे (Cyber Police Station) गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे अधिक तपास करत आहेत.

गुगल एआयवरील सर्च पडला महागात!

दुसऱ्या एका मोठ्या गुन्ह्यात गुगल एआयवर शेअर मार्केटची माहिती शोधणे नाशिकच्या तिघांना नडले आहे. सायबर टोळीने त्यांना इक्विटी नॉलेज शेअरिंग नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ओढले. अनांटियम पीईए नावाचे बनावट ट्रेडिंग अॅप डाऊनलोड करायला लावून आयपीओच्या नावाखाली मुख्य फिर्यादी, मनीषा पाटील आणि खंडेराव बोराडे या तिघांकडून २ कोटी ४२ लाख ५ हजार रुपये लाटले. या तिघांनी आयुष्यभराची पुंजी या बनावट अॅपमध्ये गुंतवली होती, जी आता सायबर चोरट्यांनी लंपास केली आहे.

चौघांना आर्थिक फटका (तपशील)

  • फिर्यादी व साक्षीदाराचे नाव व फसवणुकीचा प्रकार, गेलेली रक्कम (रुपये)
  • कॉलेज रोडवरील व्यावसायिक डेटिंग अॅप (हनी ट्रॅप) ४८,५५,८३०/
  • मुख्य फिर्यादी (गुन्हा २) शेअर मार्केट (बनावट अॅप) १,६२,०५,०००/-
  • मनीषा दीपक पाटील शेअर मार्केट (गुंतवणूक) ४८,००,०००/-
  • खंडेराव लहानू बोराडे शेअर मार्केट (गुंतवणूक) ३२,००,०००/-
  • एकूण फसवणूक (दोन गुन्हे) २,९१,६०,८३०/- रुपये

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अजय बागूलसह तिघांना हायकोर्टाकडून जामीन

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात खळबळ उडवून देणाऱ्या विसे मळा गोळीबार आणि अपहरण प्रकरणातील (Firing Case) संशयितांना अखेर दिलासा मिळाला आहे. भाजप नेते सुनील...