Thursday, May 2, 2024
Homeनगरचांद्यात युवकाची धारदार शस्त्राने हत्या

चांद्यात युवकाची धारदार शस्त्राने हत्या

अहमदनगर | Ahmednagar

नेवासा तालुक्यातील चांदा येथे काल रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास एका युवकांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली असून या भयंकर प्रकाराने चांदा सह तालुक्यात खळबळ उडाली आहे .

- Advertisement -

चांदा येथील ज्ञानदेव सोपान दहातोंडे वय ४० हे नदीजवळ चौकात थांबले असता अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले हल्लेखोर तेथुन पसार झाले दवाखान्यात जाईपर्यंत दहातोडे हे मयत झाले होते. हा हल्ला नेमक कशातून झाला या शोध पोलिस घेत आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक दिपाली काळे, शेवगावचे पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंढे, सोनई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे घटनास्थळी हजर झाले आहेत.ह्ल्ल्याचे नेमके कारण अजुन समजु शकल नाही मात्र या प्रकाराने चांदा सह परिसरात खळबळ उडाली आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या