Tuesday, March 25, 2025
Homeनगरजामखेड येथे गुटखा पकडला; दोघांवर गुन्हा दाखल

जामखेड येथे गुटखा पकडला; दोघांवर गुन्हा दाखल

जामखेड । तालुका प्रतिनिधी

जामखेड येथील बीड रोडवरील गोळी सेंटर मध्ये बेकायदेशीर विक्री करत असलेल्या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकुन २६ हजार रुपयांचा गुटखा पकडला आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असताना देखील जामखेड तालुक्यात खुलेआम गुटखा विक्री होत आहे. याबाबतची माहीती नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. या पथकाने जामखेड शहरातील बीड रोडवरील जय भगवान गोळी सेंटर याठिकाणी छापा टाकला. यामध्ये २६ हजार ५६० रुपये किमतीचा गुटखा पानमसाला आढळून आला असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे.

हे ही वाचा : विधानसभेची प्रारूप यादी आज होणार प्रसिध्द

या प्रकरणी निलेश श्रीराम कोल्हे (रा. राजुरी ता. जामखेड) व अशोक गोरख गीते (रा.मांजरी, ता. पाटोदा जि. बीड) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश श्रीराम कोल्हे या आरोपीस अटक करण्यात आली असून आशोक गोरख गीते हा फरार झाला आहे. फरार आरोपीस पोलीस कधी पकडतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी निलेश श्रीराम कोल्हे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजुळ हे करत आहेत.

हे ही वाचा : पवारांच्या आदेशामुळे नगर शहरात ‘सस्पेन्स’ वाढला

जामखेड तालुक्यात राजरोसपणे अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत आहेत. याबाबत नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने येऊन कारवाई केली आतातरी जामखेड तालुक्यात कायमस्वरूपी गुटखा बंदी होणार का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...