Monday, April 27, 2026
HomeनगरCrime News : नगर हादरलं! कांदा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करत लाखोंची रक्कम...

Crime News : नगर हादरलं! कांदा व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला करत लाखोंची रक्कम लुटली

अहमदनगर | प्रतिनिधी

अहमदनगरमध्ये भररस्त्यात एका कांदा व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यापार्‍यावर धारदार शस्त्राने वार करून त्याच्या जवळील लाखो रुपयांची रक्कम चोरटयांनी लंपास केली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आडत आणि कांदा व्यापारी समीर सय्यद हे सकाळी ११ च्या सुमारास नेप्ती मार्केटकडे येत असताना बायपास रोडवर त्यांना काही चोरटयांनी घेरले.

हे ही वाचा :  संतापजनक! दिवसाढवळ्या फूटपाथवर महिलेवर अत्याचार होत होता अन् लोक…

यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांच्याकडील लाखो रुपयांची रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. या प्राणघातक हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी जखमी व्यापार्‍याची भेट घेतली. चोरट्यांचा तातडीने शोध घेतला नाही तर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

हे ही वाचा : आई-वडिलांच्या डोळ्यादेखत बिबट्याचा मुलावर हल्ला; गंभीर जखमी मुलाचा मृत्यू

ताज्या बातम्या

Nashik NDCC Bank News : कर्जमाफीच्या अपेक्षेने वसुली कोलमडली; शेतकरी जिल्हा...

0
नाशिक | विजय गिते | Nashik राज्य शासनाकडून कर्जमाफीची (Loan Waiver) घोषणा होईल, या केवळ 'अपेक्षेपोटी' जिल्ह्यातील चालू कर्जदारांनी आपली थकबाकी भरण्याकडे पाठ फिरवली आहे....