Wednesday, September 9, 2026
Homeक्राईमCrime News : भेसळयुक्त मिठाईवर एफडीएची धडक कारवाई; ४५ लाखांचा माल जप्त

Crime News : भेसळयुक्त मिठाईवर एफडीएची धडक कारवाई; ४५ लाखांचा माल जप्त

पुणे | प्रतिनिधी | Pune

पुण्यातील (Pune) प्रसिद्ध पेठांमधील मिठाईची दुकाने आणि हॉटेल्स आता अन्न व औषध प्रशासनाच्या  रडारावर आली असून, नागरिकांच्या (Citizen) आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात प्रशासनाने मोठी मोहीम उघडली आहे. या धडक कारवाईमुळे पुणे, सातारा आणि सांगलीतील (Sangli) खाद्यपदार्थ व्यापाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

- Advertisement -

४ दिवसांत ४५.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, निकृष्ट दर्जा आणि अन्नातील भेसळीविरोधात एफडीएने २४ ते २७ जुलै दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली. या चार दिवसांच्या मोहिमेत पुणे विभागातून एकूण ४५ लाख ७० हजार १६७ रुपयांचा संशयित, निकृष्ट, असुरक्षित आणि चुकीचे लेबलिंग असलेला अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.

पुण्यातील मध्यवर्ती पेठांवर विशेष लक्ष

प्रशासनाने पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या गणेश पेठ आणि नाना पेठ परिसरातील घाऊक व्यापाऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून छापे टाकले आहेत. केवळ माल जप्त करून प्रशासन थांबले नाही, तर नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुणे शहरातील ५ प्रसिद्ध हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका कुल्फी उत्पादन केंद्राचा परवाना थेट रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात आली आहे.

सातारा आणि सांगलीतही छापे

ही मोहीम केवळ पुणे शहरापुरती मर्यादित नसून, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतही एफडीएच्या पथकांनी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर अन्नसाठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या मालामध्ये प्रामुख्याने मिठाई, कँडी, चॉकलेट्स, सुका मेवा, मसाले आणि फरसाण यांसारख्या नित्योपयोगी खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

पुढील पाऊले आणि नागरिकांना आवाहन

जप्त केलेले सर्व अन्नपदार्थांचे नमुने आता प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषी आढळणाऱ्या व्यवसायिकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सणासुदीच्या काळात भेसळीचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी उघड्यावरील किंवा संशयित ठिकाणचे खाद्यपदार्थ खरेदी करू नयेत आणि अन्नामध्ये भेसळ आढळल्यास तातडीने एफडीएकडे तक्रार करावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप पुरस्काराने गौरव

0
मुंबई | वृत्तसंस्था जगभरातील नेत्यांच्या आवाजाने दुमदुमलेल्या ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह हाऊस ऑफ लॉर्डसमध्ये आज ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. निमित्त होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना...