Tuesday, September 8, 2026
HomeनाशिकNashik Trimbakeshwar News : श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी; प्रशासन,...

Nashik Trimbakeshwar News : श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठी गर्दी; प्रशासन, पोलिसांची धावपळ

त्र्यंबकेश्वर | वार्ताहर | Trimbakeshwar

सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर आणि उद्या पहिला श्रावणी सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) भाविकांची (Devotees) मोठी गर्दी बघायला मिळत आहे. मंदिरात दर्शनासाठी (Darshan) जाण्याकरिता दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. तर ब्रह्मगिरी पर्वतावर देखील पर्यटकांच्या लांबच लांब रांगा आहेत. त्यामुळे भाविकांच्या गर्दीने त्र्यंबकनगरी गजबजून गेली आहे. 

- Advertisement -

देणगी दर्शन रांगा दूरवर

आज रविवार ( दि.१६ ऑगस्ट) रोजी भल्या पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सकाळी सातच्या सुमारास मंदिराची धर्म दर्शन रांग रिंग रोडवरून (Ring Road) कैलास राजा नगरच्याही पुढे पोहोचली होती. तर सकाळी आठ वाजेनंतर ही गर्दी काहीशी ओसरली. दुसरीकडे, प्रसाद इमारतीतून दिली जाणारी २०० रुपयांची देणगी दर्शन तिकीट मिळवण्यासाठीही भाविकांच्या दूर अंतरापर्यंत रांगा लागल्याचे चित्र होते. त्र्यंबकमधील या गर्दीचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर वाहनांच्या रांगा

सलग सुट्यांमुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून त्र्यंबकमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर (Nashik-Trimbakeshwar Road) वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महिरावणी ते तळेगाव फाट्यापर्यंत वाहनांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. तर खाजगी वाहनांना त्र्यंबक शहरात प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांना तळेगाव फाट्यापासून पर्यायी मार्गाने वळविले जात आहे. खासगी वाहने तळेगाव फाट्यापर्यंत जात असून, तेथून भाविकांना एसटी महामंडळाच्या बसेसने त्र्यंबकेश्वरला जाण्याची सोय प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वाहने घसरण्याच्या तक्रारींनंतर प्रशासनाची धावपळ

नाशिक-त्र्यंबक रस्त्याचे काम चालू असून, एका बाजूने वाहतूक सुरु आहे. मात्र, सिमेंट काँक्रीटच्या कामामुळे आणि साचलेल्या माती व तेलामुळे वाहने घसरून अपघात होत असल्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी काही दुचाकीस्वार घसरून जखमी झाले होते. याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यावरील माती आणि साचलेले तेल साफ करण्याचे काम हाती घेतले.

ब्रह्मगिरीवर पर्यटकांची गर्दी

काल (शनिवारी) दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे ब्रह्मगिरी पर्वत आणि परिसरातील धबधबे प्रवाहित झाले. हा निसर्गरम्य नजराणा पाहण्यासाठी पर्यटकांची अलोट गर्दी झाली होती.पर्वतावर येणाऱ्या-जाणाऱ्या पर्यटकांची एवढी गर्दी झाली की दूरवरून ही रांग मुंग्यांच्या ओळीसारखी दिसत होती. दुपारी चारच्या सुमारास वर गेलेले पर्यटक सुरक्षितपणे खाली उतरावेत यासाठी खालील पर्यटकांना काही काळ रोखून धरावे लागले, ज्यामुळे गंगाद्वार परिसरात मोठी गर्दी जमा झाली होती. खराब रस्ते असूनही या परिसरात जवळपास ७०० हून अधिक दुचाकी वाहने दाखल झाली होती.

ताज्या बातम्या

चौकशीसाठी आलेल्या पथकासमोरच प्राध्यापकाचा हृदयविकाराने मृत्यू

0
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon येथील मुनिसिपल हायस्कूल व जूनियर कॉलेजमध्ये आज चौकशीसाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यां समोर एका प्राध्यापकास सततच्या चौकशीचे मानसिक तणावाने कार्यालयातच...