Thursday, May 2, 2024
Homeनगरसराईत गुन्हेगार बंटी राऊत एक वर्षासाठी स्थानबद्ध

सराईत गुन्हेगार बंटी राऊत एक वर्षासाठी स्थानबद्ध

अहमदनगर|Ahmedagar

शहरातील सराईत गुन्हेगार बंटी ऊर्फ भावेश अशोक राऊत (वय- 29 रा. लाटेगल्ली, माणिकचौक) याच्याविरूद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी नाशिकच्या कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

- Advertisement -

राऊत याच्याविरूद्ध शहरातील तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 9 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खंडणी, सरकारी कामात अडथळा आणणे, शस्त्र बाळगणे, दंगा, दरोडा आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. राऊत याच्यावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव कोतवाली पोलिसांकडून मागविण्यात आला होता. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी यावर निर्णय घेऊन राऊत विरोधात ही कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, शहर उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाने राऊत याला अटक करून नाशिक कारागृहात स्थानबद्ध केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या