Friday, May 3, 2024
Homeनाशिकनवीन नाशकात लसीकरण केंद्रांवर गर्दी

नवीन नाशकात लसीकरण केंद्रांवर गर्दी

नवीन नाशिक | Nashik

मागच्या आठवड्यात काही दिवस बंद असलेले लसीकरण गुरुवारी पुन्हा सुरू झाल्याने नवीन नाशकातील अचानक चौक व मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात लसीकरण केंद्रात सकाळी पाच वाजेपासून लस घेण्यासाठी गर्दी झाली.

- Advertisement -

त्यात लसीचे डोस कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने अनेक नागरिकांना माघारी जावे लागल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

येथील श्री स्वामी समर्थ दवाखाना, कामटवाडे येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय केंद्र, महालक्ष्मी नगर येथील समाज मंदिर, अचानक चौक दवाखाना, पिंपळगाव खांब या पाचही ठिकाणी महापालिकेच्यावतीने ४५ वयोगटाच्या पुढील नागरिकांसाठी लसीकरण करण्यात येत आहे.

लस घेण्यासाठी गुरुवारी नागरिकांनी सकाळी पाच वाजेपासून लांबच लांब रांगा लावल्या होत्या. लसीकरण केंद्रावर कोणत्याही प्रकारे टोकण पद्धत किंवा नियोजन नसल्याने सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

अचानक चौक येथील लसीकरण केंद्रात ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेल्या 100 ते 120 नागरिकांनाच लसीकरण करण्यात आले यामुळे सकाळपासून लसीकरणासाठी नंबर लावलेल्या नागरिकांना माघारी फिरावे लागल्याने नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

लस घेण्यासाठी येणारे नागरिक ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून येत नसल्याने लसीकरण केंद्रावर आल्यावर पुन्हा रजिस्ट्रेशन करावे लागते त्यात यामुळे लसीकरण विलंब होत असतो. एका लसीकरण केंद्रावर सकाळपासून सुमारे चारशे ते पाचशे नागरिक लस घेण्यासाठी रांगा लावून भर उन्हात ताटकळत उभे राहतात .

५ केंद्र मिळून दिवसभरात सुमारे ६५० ते ७०० नागरिकांनाच लस दिली जात आहे. मात्र गुरुवारी एकच लसीकरण केंद्रावर उपलब्ध असल्याने अन्य चार लसीकरण केंद्र बंद होते. तर शुक्रवारी लस उशिराने आल्याने जेष्ठ नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

येथील लसीकरण केंद्रांवर जेष्ठ नागरिक तसेच महिलांना बसण्याची व्यवस्था देखील नसल्याने नाराजीचा सुर उमटत होता. मनपा प्रशासनाने लसीकरनाचे व्यवस्थित नियोजन करावे तसेच येथे येणाऱ्या नागरिकांना निदान बसण्याची तरी व्यवस्था करावी अशी मागणी नवीन नाशिककरांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या