Wednesday, May 21, 2025
Homeदेश विदेशदेशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

वायनाड- देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. जगाच्या नजरेत भारत हा बलात्काराची राजधानी झालाय, असा संताप राहुल यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

केरळमधील वायनाडमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. काही दिवसांपूर्वीच हैदराबाद येथे एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिला जिवंत जाळण्यात आलं. तर, उन्नाव येथील बलात्कार पीडित न्यायालयात जबाब नोंदवण्यासाठी जात असताना तिला जाळण्यात आलं.

उपचारादरम्यान आज पहाटे तिचा मृत्यू झाला. महिलांवरील या अमानुष अत्याचाराविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून आज मोदी सरकारला धारेवर धरलं. हल्ली जग भारताला बलात्काराची राजधानी म्हणून ओळखू लागलंय. भारतात आया-बहिणींचं संरक्षण करू शकत नाही का, असा प्रश्न अन्य देश विचारू लागले आहे, असं ते म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Puja Khedkar : पूजा खेडकरला ‘सर्वोच्च’ दिलासा! न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

0
दिल्ली । Delhi यूपीएससी परीक्षेतील फसवणुकीच्या प्रकरणात अडकलेल्या माजी प्रशिक्षक आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन...