Tuesday, July 16, 2024
HomeUncategorizedCyber ​​crime ; उच्चशिक्षितांना सहा लाखांचा गंडा

Cyber ​​crime ; उच्चशिक्षितांना सहा लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

- Advertisement -

शहरात दोन वेगवेगळ्या घटनांत एका प्राध्यापकाला पार्ट टाईम जॉबच्या नावाखाली ४ लाख ८८ हजारांचा तर दुसर्‍या एका व्यक्‍तीला डिश टीव्हीच्या (Dish TV) रिचार्ज प्रकरणात ९९ हजार ९९९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक (Online fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या दोन्ही घटनांत जवळपास ६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील वाहेद कॉलनी, रोशनगेट परिसरात राहणारे प्रा.डॉ. रियाझुद्दीन शमशुद्दीन कुरेशी हे मौलाना आझाद महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला आहेत. १ ते ८ मार्चदरम्यानच्या काळात राजेंद्र रमेशभाई परमार (रा. प्लॅटिनम गोल्ड, जे.डी. हायस्कूलजवळ, मेमको, नरोडा रोड, अहमदाबाद, गुजरात) या भामट्याने ऑनलाईन पार्ट टाईम जॉबचे आमिष डॉ.रियाजुद्दीन कुरेशी यांना दाखविले. त्यानंतर भामट्याने डॉ. रियाजुद्दीन कुरेशी यांचा विश्‍वास संपादन करून इंटरनेटच्या साह्याने डॉ. रियाजुद्दीन कुरेशी यांच्या पत्नी, आई व मुलांचे बँक खाते हॅक करून त्यातील ४ लाख ८८ हजार रुपये ऑनलाईन काढून घेतले. हा प्रकार लक्षात आल्यावर प्रा.डॉ. रियाजुद्दीन कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजेंद्र परमार या भामट्याविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक भंडारे करीत आहेत.

दुसर्‍या प्रकरणात चिनार गार्डन, पडेगाव येथे राहणारे मोहम्मद ख्वाजा मोहम्मद इस्माईल यांना त्यांच्या घराचे डिश टीव्हीला रिचार्ज करण्यासाठी १६ मार्च रोजी त्यांनी ३०६ रुपये ऑनलाईन भरले. पैसे भरल्यानंतर डिश टीव्ही आली नाही. शिवाय पैसेही परत आले नाहीत. यामुळे मोहम्मद ख्वाजा यांनी ऑनलाईन तक्रार केली. ऑनलाईन तक्रार केल्यानंतर संबंधितांनी एका वेबसाईटवर करण्याचे सांगितले. मोहम्मद ख्वाजा यांनी व त्यांच्या नातींनी ऑनलाईन तक्रार नोंदविली. ही माहिती नोंदविल्यानंतर २० मार्च रोजी एसबीआय बँकेने त्यांना तुमच्या खात्यावरून ९९ हजार ९९९ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याचे सांगितले. या प्रकरणी मोहम्मद ख्वाजा यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला असून, या फसणुकीबाबत ऑनलाईन तक्रारही दाखल केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या