Tuesday, November 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'अकवान' वादळ आंध्र प्रदेशच्या दिशेने; महिनाभरात तिसरे वादळ

‘अकवान’ वादळ आंध्र प्रदेशच्या दिशेने; महिनाभरात तिसरे वादळ

पुणे | प्रतिनिधी Pune

- Advertisement -

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचे वादळात रूपांतर झाले असून, दोन दिवसात याची तीव्रता वाढून ते आंध्र किनारपट्टीला शुक्रवारी रात्री धडकण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. गेल्या महिनाभरातील बंगालच्या उपसागरातील तसेच आंध्र प्रदेशला धडकणारे हे तिसरे वादळ आहे.

दक्षिण -पश्चिममध्य बंगालच्या उपसागरात असलेले अकवान वादळ ताशी ३ किमी वेगाने उत्तर -उत्तर पश्चिमेच्या दिशेने भारतीय भूभागाकडे प्रवास करीत आहे.मंगळवारी हे वादळ चेन्नईच्या पूर्वेला समुद्रात ६०० किमी,आंध्रच्या मछलीपट्टनम व विशाखापट्टणमच्या दक्षिण पूर्वेला ६५० किमी,तर ओरिसाच्या गोपाळपूर पासून ७४० किमी अंतरावर होते. उत्तर – उत्तर पश्चिमेच्या दिशेने प्रवास करत असताना १९ नोव्हेंबर पर्यंत याचे अती तीव्र वादळात रूपांतर होणार आहे.

आंध्र प्रदेशातील नेल्लोर तसेच विशाखापट्टणम किनारपट्टीदरम्यान हे वादळ शुक्रवार २० नोव्हेंबर च्या रात्री धडकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान ताशी १२० ते १४५ किमी वेगाने वारे वाहणार आहेत.यामुळे आंध्रच्या अनेक भागात बुधवारपासून वारा तसेच पावसाची तीव्रता वाढणार आहे. मुरासु, तसेच अर्णब नंतर अवघ्या महिन्याभरात अकवान वादळ निर्माण झाले आहे. यापूर्वीच्या दोन वादळांमुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे.अकवान मुळे यंत्रणा सतर्क झाली असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. समुद्र खवळलेला राहणार असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भात पाऊस
राज्यात पुढील ३ दिवस कोरडे हवामान राहणार आहे.थंडीचा कडाका कायम असून, वादळानंतर मात्र विदर्भाच्या काही भागात २१ नोव्हेंबर रोजी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.यामुळे थंडीची तीव्रता घटण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी विशेष अभियान

0
नाशिक, दि. 17 नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला (Digital Life Certificate)...