Sunday, June 14, 2026
HomeनाशिकNashik News : रामनगर, ओबारासह दहिवड शिवारातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट...

Nashik News : रामनगर, ओबारासह दहिवड शिवारातील काही भागात वादळी वाऱ्यासह गारपीट व पाऊस

दहिवड |प्रतिनिधी| Dahiwad

देवळा (Deola) तालुक्यातील रामनगर, ओबारा सह दहिवड शिवारात गुरुवार  (दि १९) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने (Hail) व पावसाने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. 

- Advertisement -

सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी व बेमस मी पावसाने हजेरी लावली असून देवळा तालुक्यातील रामनगर ओबारा परिसरात व दहिवड शिवरातील काही भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने व पावसाने शेतातील काढणीला आलेला कांदा (Onion), डाळिंब (Pomegranate), गहू (Wheat) याचबरोबर कांद्याचे बी तयार करण्यासाठी लावलेले टोंगळे पूर्णपणे नसते नाबूत झाल्याणे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

आधीच शेती पिकांना भाव नसल्यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलेला आहे एकीकडे सुलतानी संकटाला तोंड देऊन शेतकरी राजा आपले काम करीत असताना आज अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने झालेल्या नुकसानीमुळे  अस्मानी संकट सुद्धा त्याच्यावर ओढवले आहे.

सदर गारपीट झालेल्या भागाची त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाच्या वतीने करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...