तमाम पालकांनी (Parents) पुन्हा एकदा डोक्यावर हात मारून हताश व्हावे, अशी घटना कोल्हापूरमध्ये उघडकीस आली. राज्यात नुकतीच शिक्षक पात्रता परीक्षा (TET Exam) पार पडली. सर्वोच्च न्यायालयाने ही परीक्षा देणे सर्व शिक्षकांसाठी बंधनकारक केले आहे. ही परीक्षा भूतकाळात अनेकदा गैरप्रकारांमुळे गाजली आहे. हेही वर्ष त्याला अपवाद ठाले नाही. परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आले. त्या आरोपावरून अटक केलेल्यांमध्ये काही शिक्षकांचा समावेश असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. अर्थात, हा काही पहिला गैरप्रकार नाही. याआधीही डमी उमेदवार परीक्षेला बसवणे, लाच घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करणे असे अनेक आरोप झाले होते.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्तांना अटक देखील झाली होती. पण, ज्या शिक्षकांकडून गुणवान पिढी घडवण्याची अपेक्षा समाज बाळगतो त्यांच्यावरच उपरोक्त आरोप व्हावा, ही शिक्षण क्षेत्राची शोकांतिका आणि पालक-विद्यार्थ्यांची चेष्टा आहे. इत्तर गुन्हेगारांसारखे तोंड काळ्या फडक्याने झाकून खाली मान घातलेल्या शिक्षकांचे माध्यमात प्रसिद्ध झालेले छायाचित्र संवेदनशील माणसांना अस्वस्थ करणारे ठरावे, या परीक्षेचा निकालही फारसा उत्साहवर्धक लागत नसल्याची चर्चाही अधूनमधून झडते. समाज मूल्यांची घसरण आपण अनुभवतो. आदर व्यक्त करण्याचा आदेश देण्याची वेळ शासनावर येते. विद्यार्थी शिक्षकांना मान देत नाहीत, अशीही तक्रार असते. विद्याध्यांमध्ये आक्रमकता आणि हिंसक वृत्ती वाढत आहे. अशा अनेक दुष्परिणामांची पाळेमुळे उपरोक्त प्रकरणांमध्ये सापडू शकतील. पदप्राप्तीसाठी कौशल्यप्राप्ती अनिवार्य आहे.
ज्ञान आणि तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. त्यामुळे विविध प्रकारची आव्हाने देखील निर्माण होत आहेत. त्यानुसार प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींची कौशल्ये विकसित होणे आणि पात्रतेत काळानुसार बदल होणे स्वाभाविक मानले जाते. कदाचित म्हणूनच अनेक क्षेत्रात ज्ञान अद्ययावत करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे राबवली जातात. शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यामागचा एक उद्देश तो देखील आहे. एकवेळ पेपर अवघड जाणे पालक समजू शकतील. पण त्यासाठी प्रश्नपत्रिका फोडणे म्हणजे गंभीर गुन्हाच, जो परीक्षेच्या मूळ उद्देशालाच सुरुंग लावतो, असे शिक्षक मुलांसमोर काय आदर्श ठेवतील? त्यांच्या सहवासात मुलांमध्ये कोणल्या प्रकारची मुल्ये रुजू शकतील? असे प्रश्न पालकांना पडले असतील. अशा महाभागांचा गुन्हा फक्त एवढाच नसतो. शिक्षकी पेशाच त्यांच्यामुळे बदनाम होतो. पालकांच्या मनात संशय निर्माण होण्याचे पाप त्यांच्याच डोक्यावर मारावे लागेल. वास्तविक, मुलांच्या जडणघडणीच्या वयाच्या टप्यात शिक्षक (Teacher) मोलाची भूमिका बजावतात. साने गुरुजी हे विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. शिक्षक कसा असावा, असे सांगताना ते म्हणत, ‘जसे गुळाच्या भेलीभोवती मुंगळे गोळा होतात, तशी ज्याच्याभोवती मुले गोळा होतात तो खरा विद्यार्थीप्रिय शिक्षक, असे शिक्षक आजही मोठ्या संख्येने आढळतात, जे विद्यार्थीत्रिय असतात. अशा शिक्षकांची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थी आणि त्यांचे पालक रस्त्यावर देखील उतरल्याच्या घटना अधूनमधून घडतात.
करोना (Corona) काळाने अशा अनेक सर्जनशील, प्रयोगशील आणि शिकण्याप्रती संवेदनशील शिक्षकांचा समाजाला परिचय करून दिला, शाळा बंद असतानाही शिकणे मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक शिक्षकांनी अभिनव मार्ग शोधले. शाळा मुलांच्या उंबरठ्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्वे त्यांच्या जडणघडणीचे श्रेय त्यांच्या शिक्षकांनाही भरभरून देतात. अशा शिक्षकांचे विद्याथ्यांशी असलेले बंध अधिकाधिक घट्ट होत जाताना आढळतात. विद्यार्थी कितीही प्रभावशाली झाला आणि शिक्षकांची भेट झाली तरी तो आपसूकच शिक्षकांचे चरणस्पर्श करतो ते उगाच नव्हे. शिक्षकांची गुणवत्ता चाहाबी आणि अशा शिक्षकांनी शिक्षणाच्या मूलभूत हकांची परिपूर्तता करावी ही सरकारची आणि समाजाचीही अपेक्षा रास्तच नाही का? सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते आणि शिक्षक हा त्यातील सर्वाधिक महत्वाचा घटक मानला जातो. असे शिक्षक घडवण्याचा पात्रता परीक्षा हा एक मार्ग मानला जायला हवा. परीक्षेमागचा तो उद्देश हरवून कसे चालेल? उपरोक्त उल्लेखिलेले गैरप्रकार तो उद्देश फक्त कागदोपत्री सिद्ध करण्याचाही प्रकार मानला जाबला हवा. होही गुन्हा अती गंभीर मानला जायला हवा. तेव्हा या परीक्षेतील गैरप्रकारांचा सखोल तपास करून दोषीना कठोर शासन करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. तरच गैरप्रकारांना आळा बसू शकेल.





