Monday, May 20, 2024
Homeजळगाव‘दक्ष नागरिक’ जनजागरण पथनाट्य : धरणगाव पोलीस स्टेशनचा उपक्रम

‘दक्ष नागरिक’ जनजागरण पथनाट्य : धरणगाव पोलीस स्टेशनचा उपक्रम

धरणगाव – प्रतिनिधी dharangaon

येथील पोलीस (police) हद्दीतील बस स्टाप, छत्रपती शिवाजी महाराज चौक, इंदिरा कन्या शाळा, शहरात विविध ठिकाणी व पाळधी (paldhi) येथे दक्ष नागरीक जनजागरण पथनाट्य सादर करण्यात आले. ज्युनिअर चार्ली (Junior Charlie) समाजसेवक सुमित पंडित, यांच्या मुक अभियानातून विविध गाण्यांतून जनतेस सावधान राहण्याचे आव्हान करण्यात आले.

- Advertisement -

कोरोना (corona) महामारी नंतर सर्वात मोठा सण दिवाळी हा साजरा केला जाणार आहे, यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली धरणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी एक संकल्पना आखून नागरिकांची जनजागृती केली. नागरिकांनी कसे सतर्क राहावे याचे आव्हान केले. चोरी, मारामारी,चैन स्नँकींग, पाॅकेट मारी, दुचाकी, चार चाकी चोरी यापासुन सतर्क कसे राहावे याची जनजागृती केली. त्यांना माणुसकी रुग्णसेवा समूहाची मदत लाभली.

आपला शेजारी,खरा पहारेकरी या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातुन नागरिकांना सतर्क राहण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला. पोलीस निरीक्षक राहुल खताळ,पोलीस उप निरिक्षक संतोष पवार,अमोल गुंजाळ,पो.हे.काँ.संजय सुर्यवंशी,पो.हे.काँ.ईश्वर शींदे,वैभव बाविस्कर,गजेद्र पाटील,पो.ना.मीलींद सोनार,विजय धनगर,

विनोद संदानशीव,अरुण सातपुते,महिला पोलीस कर्मचारी मंगला पवार,हर्षली खैरनार,व नागरीकांनी मोठ्या उत्साहाने जनजागृती अभियानात सहभाग घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या