जळगाव jalgaon । प्रतिनिधी
कुटुंबियांसह नाशिकला लग्नासाठी गेलेल्या लॉन्ड्री व्यावसायिकाच्या (laundry professional) घरात चोरट्यांनी (Thieves broke house) डल्ला मारल्याची घटना गणेश कॉलनीतील शिवसागर अपार्टमेंटमध्ये (Shivsagar Apartment) घडली. याठिकाणाहून चोरट्यांनी (thieves) सोने-चांदीच्या दागिंन्यासह (gold-silver ornaments) रोख रक्कम अशी एकूण 2 लाख 9 हजार रूपयांचा ऐवज लांबविला.याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात (Zillapeth Police Station) चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गणेश कॉलनीतील शिवसागर अपार्टमेंटमध्ये तन्मय पद्माकर पिले हे आई, पत्नी व मुलासह वास्तव्यास आहे. त्यांचा लाँड्रीचा व्यवसाय असून त्यावर ते कुटुंबाचा उदनिर्वाह करतात. शुक्रवारी पहाटे 5 वाजता पिले कुटूंबिय अपार्टमेंटमधील फ्लॅटला कुलूप लाऊन नाशिक येथील लग्नाच्या कार्यक्रमाला त्यांच्या खासगी कारने गेले असल्याने त्यांचे घर बंदच होते. हीच संधी साधत चोरट्यांनी पिले कुटूंबियांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घररात प्रवेश करीत घरात ठेवलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकडवर हात साफ करीत पोबारा केला.
पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी
अपार्टमेंटमधील घरात चोरीची झाल्याची माहिती तन्मय पिले यांनी जिल्हापेठ पोलिसांना दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक गणेश देशमुख, संदीप पाटील, केतन पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर रात्री पिले यांनी तक्रार दिल्यानंतर चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बहिणाबाईंच्या साहित्यामुळे जगण्याचे बळ : साहित्यिक आबा महाजन
बचतीच्या पैशांसह दागिने केले लांबविले
घटनेची माहिती मिळताच पिले कुटूंबिय यांनी नाशिक येथून सायंकाळी जळगाव गाठले. यावेळी त्यांनी तन्मय यांना त्यांच्या पत्नीने स्टीलच्या डब्ब्यात बचत करून ठेवलेले 47 हजार रूपयांची रोकड तसेच कपाटातील लॉकरमधील 23 हजार रूपये, 40 हजार रूपये किंमतीची मंगळसूत्राची पोत, 20 हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन, 6 हजार रूपये किंमतीची अंगठी, 20 हजार रूपये किंमतीचे ब्रेसलेट, 10 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे कानाचे टॉप्स, 2 हजार रूपये किंमतीचे एक सोन्याचे आपट्याचे पान, 1 हजार रूपये किंमतीचे चार चांदीचे ग्लास असा एकूण 2 लाख 9 हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे त्यांना दिसून आले.
VISUAL STORY : आणि अभिनेत्री सायली संजीवने उघड केलं गुपित
शेजारच्यांनी फोन केल्यामुळे उघडकीस आली घटना
शुक्रवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास तन्मय पिले यांना त्यांच्या शेजारी राहणारे अविनाश झोपे यांनी पिले यांना तुमच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा असून तुम्ही कुठे आहेत, अशी विचारणा केली. तेव्हा पिले यांनी आम्ही नाशिक येथे असून तुम्ही घरात जाऊन पाहणी करा, असे सांगितले. झोपे यांनी घरात पाहणी केली. तेव्हा त्यांना फ्लॅटमधील लोखंडी, लाकडी कपाट फोडलेले तर कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. त्यांनी लागलीच ही बाब पिले कुटूंबियांना सांगितली.
बस मधून दाम्पत्याचे 52 ग्रॅम सोने लंपास




