रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangaon Deshmukh
प्लॉटच्या व्यवहारातील पैसे परत मागितल्याच्या कारणावरून वाद (Dispute) होऊन कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द (Dauch Khurd) शिवारात एका 35 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Youth Murder) बुधवारी 10 डिसेंबर रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी चार आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopargav City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असलम शहाबुद्दीन सय्यद (वय 35 रा. डाऊच खुर्द, ता. कोपरगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मयताचे भाऊ रफिक शहाबुद्दीन सय्यद यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजिज शेख, परविन मुनीर शेख, फिरोज मुनीर शेख, आणि साहिल मुनीर शेख, सर्व राहणार खडक वसाहत, डाऊच खुर्द, ता. कोपरगाव यांच्याविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत असलम शहाबुद्दीन सय्यद यांना आरोपींनी डाऊच खुर्द शिवारातील खडक वसाहत येथे शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी साहिल मुनीर शेख याने असलम सय्यद यांना चाकूने मारण्याची धमकी (Threat) देत त्यांच्या छातीवर, डोक्याजवळ आणि कानाजवळ अनेक ठिकाणी चाकू खुपसले. आरोपी मुनीर उर्फ मुन्ना अजिज शेख याने लाकडी दांडक्याने मारहाण करून असलम सय्यद यांची हत्या (Murder) केली.
तसेच भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या साक्षीदारांनाही आरोपींनी मारहाण (Beating) केली. आरोपी फिरोज मुनीर शेख याने साक्षीदाराच्या तोंडावर विटा घालून जखमी केले. आरोपी परविन मुनीर शेख यांनी मयताची पत्नीलाही लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




