Friday, November 22, 2024
HomeराजकीयAjit Pawar "आर.आर.पाटलांनी माझा केसाने गळा कापला"; अजित पवारांचे गंभीर आरोप, नेमकं...

Ajit Pawar “आर.आर.पाटलांनी माझा केसाने गळा कापला”; अजित पवारांचे गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) अर्ज दाखल करण्यासाठी आज दुपारी तीन वाजेपर्यंत शेवटची मुदत होती. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या (Mahayuti and Mahavikas Aaghadi) उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर आता खऱ्या अर्थाने सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना पाहायला मिळणार आहे. मात्र, त्याआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर पाटील यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. तासगाव-कवठेमहांकळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Political : निफाड मतदारसंघातून गुरुदेव कांदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “सिंचन गैरव्यवहार प्रकरणाचे माझ्यावर आरोप झाले.सुमारे ७० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला, असा आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. माझ्यावर सारखंसारखं ७० हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला होता. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून माझ्यावर आरोप होईपर्यंत जलसंपदा विभागाचा पगारसहीत खर्च सुमारे ४२ हजार कोटी रुपये झाला होता आणि माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांना विश्वास वाटू लागला होता. पण त्या आरोपानंतर जलसंपदा विभागाच्या गैरव्यवहारप्रकरणी एक फाईल तयार झाली.त्यांनी (तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील) अजित पवार यांची ओपन चौकशी करावी, म्हणून त्या फाईलवर सही केली. केसाने गळा कापायचे धंदे आहेत राव. त्यांनी सही केलेली मलाही माहिती नव्हते”, असे अजित पवारांनी म्हटले.

हे देखील वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पाच उमेदवारांची यादी जाहीर; पंढरपूरात होणार मैत्रीपूर्ण लढत?

पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, “मला हेही माहिती नव्हते आपण पृथ्वीराज बाबांचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळे राष्ट्रपती राजवट आली. त्यावेळेसचे राज्यपाल म्हणाले, या फाईलीवर मी सही करणार नाही. निवडून आलेला मुख्यमंत्री या फाईलीवर सही करेल. लोकशाही आहे. निवडणूक झाली. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार निवडून आले. देवेंद्र फडणवीस यांनी सही केली आणि मला सांगितलं की, या इकडे, त्यांनी मला घरी बोलावलं. म्हणाले, हे बघा ही सही मुख्यमंत्र्यांकरता राहिली होती. तुमच्या आबांनी चौकशी उघड करण्याकरता सही केली आणि खरंच तिथे सही होती”, असेही त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : Nashik Political : नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी; शिवसेनेने दिले राष्ट्रवादी विरोधात उमेदवार, पक्षाचे एबी फॉर्मही जोडले

दरम्यान, अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर आर.आर. पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,आबा प्रामाणिकपणे, स्वच्छपणे काम करत होते, महाराष्ट्रात गृहमंत्रिपदी असताना पारदर्शक भरती करून घेतली. अत्यंत सक्षमपणे त्यांनी गृहमंत्रिपद सांभाळले. आज आबांना जाऊन साडे नऊ वर्ष झाली, आज त्यांच्यावर आरोप झाले ते पाहून अतिशय दुख:झाले. अजित पवार ज्येष्ठ आहेत. आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम केले आहे. त्यांनी जे आरोप केले ते कुटुंब म्हणून वाईट वाटले. आबा हयात असते तर आबांनी त्याला उत्तर दिले असते. आबांनी डान्सबार बंदीचा निर्णय घेतला, यावेळी त्यांना मोठमोठ्या ऑफर असताना डान्सबार बंदीवर ते ठाम राहिले. महाराष्ट्रातील विचारांचे संरक्षण झाले पाहिजे हा विचार त्यांनी मांडला. या वक्तव्याच्या विरोधात जनता उत्तर देईल असे म्हणत त्यांनी आरोपांना प्रत्युत्तर दिले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या