Friday, April 25, 2025
Homeनगरआचारसंहितेपूर्वी 75 हजार कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देणार - अजित पवार

आचारसंहितेपूर्वी 75 हजार कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देणार – अजित पवार

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मंत्रिमंडळाने विदर्भाला वरदान ठरणार्‍या 85 हजार कोटींच्या वैनगंगा-पैनगंगा प्रकल्पाला मान्यता दिली. त्याप्रमाणे पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोर्‍यात वळविल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नार पार, अप्पर वैतरणा व वळण बंधारे अशा प्रकल्पांना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी 75 हजार कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देणार, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

- Advertisement -

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांचा अभीष्टचिंतन सोहळा व मतदार संघातील 300 कोटींच्या विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले. यावेळी ना. अजित पवार बोलत होते. याप्रसंगी आ.माणिकराव कोकाटे, आ.किशोर दराडे, माजी आ. नरेंद्र घुले, माजी आ चंद्रशेखर घुले, राजश्रीताई घुले, माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, इंद्रनाथ पा.थोरात, पुष्पाताई काळे, डॉ. मेघना देशमुख, चैताली काळे, सिद्धार्थ मुरकुटे, उदयन गडाख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, प्रविण पाटील, अ‍ॅड. प्रमोद जगताप, आबासाहेब थोरात, विजयराव वहाडणे आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. अजित पवार म्हणाले, नगर जिल्ह्याला अनेक थोर नेते मिळाले हे जिल्ह्याचे भाग्य असून राज्याच्या 36 जिल्ह्यांत एवढ्या मोठ्या ताकदीचे नेते एकाही जिल्ह्याला मिळाले नाही. नगर जिल्ह्यात कर्मवीर शंकरराव काळे यांचे नाव अग्रभागी आहे. त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा माजी आमदार अशोकराव काळे यांनी समर्थपणे पुढे चालविताना मतदार संघाच्या विकासाला आकार देऊन रखडलेली महत्वाची विकासकामे पूर्ण केली. सर्वांना सोबत घेवून विकास कामांना निधी देताना कधीही राजकारण न करता माजी आ. अशोकराव काळे यांना विकास कामांसाठी मदत केली असल्याचे ना. पवार यांनी आवर्जून सांगितले.

मतदार संघातील जनतेने काळे परिवारावर प्रेम केले. हे प्रेम कर्मवीर शंकरराव काळे, अशोकराव काळे यांना देखील मिळाले व आशुतोषला देखील मिळत आहे. काळे परिवाराचा हा वारसा आ. आशुतोष काळे पुढे चालवत असून त्यांनी मागणी केली की, काही करा ज्याप्रमाणे मंत्रिमंडळाने विदर्भाला वरदान ठरणार्‍या 85 हजार कोटींच्या वैनगंगा पैनगंगा प्रकल्पाला मान्यता दिली. त्याप्रमाणे पश्चिमेचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला गोदावरी खोर्‍यात वळविल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे नार पार, अप्पर वैतरणा व वळण बंधारे अशा प्रकल्पांना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी 75 हजार कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देण्याचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अशोकराव काळे म्हणाले, राजकीय जीवनात 2004 साली माझ्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर व असंख्य शिवसैनिक व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने निवडून आलो. माझ्या राजकीय जीवनात स्वत:च्या फायद्यासाठी कधीही तत्वांशी तडजोड केली नाही. जे काही केले, जे काही निर्णय घेतले ते समोर घेतले. बेगडी राजकारण कधीही केले नाही. जे पोटात तेच ओठात, जे आहे ते आहे, जे नाही ते नाहीच असा माझा स्वभाव. आ. आशुतोष काळे म्हणाले, ना. अजित पवार यांचा कामाचा व्याप पाहता बारामती मतदार संघ सोडला तर एक मतदार संघात दहा दिवसाच्या अंतराने दुसर्‍यांदा ते कधीही गेले नाहीत. मात्र कोपरगाव त्याला अपवाद ठरला. कर्मवीर काळे व अशोकराव काळे यांच्याकडून मला मिळालेल्या सहवासातून दहा नको, दोनच पण जीवाचे कार्यकर्ते या विचारांवर काम करीत आलो. वडिलांच्या आग्रहास्तव 2014 च्या निवडणुकीला सामोरे गेलो. दुर्दैवाने पराभव झाला. त्यानंतर आई-वडिलांना आजाराला सामोरे जावे लागले. त्यावेळी मतदार संघातील जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी पाठबळ दिले, मोलाची साथ दिली. एवढेच नव्हे तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून देखील आणले.

आशुतोषला लई-लई मताधिक्य द्या, मी लई-लई निधी देईल

लोकप्रतिनिधी म्हणून अनेक दिग्गजांनी काम केले परंतु कोपरगाव मतदार संघ अस्तित्वात आल्यापासून तुलनेत सर्वात जास्त निधी कोणी आणला असेल तर आ. आशुतोष काळेंच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आला आहे. मतदार संघाच्या विकासासाठी 3000 कोटी निधी आणणे येड्या गबाळ्याचे काम नाही. 2019 प्रमाणे यावेळी आशुतोषला लई-लई मताधिक्य द्या मी देखील लई-लई निधी देईल.

– उपमुख्यमंत्री अजित पवार

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...