Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजउपमुख्यमंत्री अजित पवारांचे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधीच मतदानाबाबत मोठे विधान; म्हणाले…

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधीच मतदानाबाबत मोठे विधान; म्हणाले…

नाशिक | Nashik

केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commission) आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड (Maharashtra Vidhansabha Election 2024) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करणार आहे. त्यामुळे आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे. मात्र, या पत्रकार परिषदेआधीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभा निवडणुकीचे मतदान (Voting) कधी असणार याचा अंदाज लावला आहे. ते नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : महायुतीकडून राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी ७ नावांवर शिक्कामोर्तब; ‘यांना’ मिळाली संधी

यावेळी अजित पवार म्हणाले की, “आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. आज निवडणूक (Election) जाहीर होईल, असा माझा अनुभव आहे. दसरा दिवाळीनंतर (Diwali) तुळशीच्या लग्नावेळी मतदान असेल, असा माझा अंदाज आहे. दुपारी ३ नंतर कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही, म्हणून आज सकाळी आलो असल्याचे” त्यांनी म्हटले आहे. तसेच यापुढे मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रमुख म्हणून प्रचाराला यायचे आहे. आज तीन वाजता आचारसंहिता लागणार आहे. त्याआधी अनेक मतदारसंघाला निधी मंजुर होईल, असे सांगूनच मी याठिकाणी आलो आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

हे देखील वाचा : MVA Seat Sharing : मविआचा जागावाटपाचा ‘असा’ आहे संभाव्य फॉर्म्युला; सपा, शेकापला किती जागा मिळणार?

तसेच “आपल्या पक्षाचा भक्कम नेता बाबा सिद्धिकी (Baba Siddiqui) आपण गमावला आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही सतत लोकांशी संपर्क ठेवत असून काम करत आहोत.आम्ही जात-पात बघत नाही. १८ पगड जाती घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्या पद्धतीने यशवंतराव चव्हाण यांनी जसे सुसंस्कृत राज्य चालवले तसे आम्ही चालवत आहोत”, असेही अजित पवारांनी म्हटले.

हे देखील वाचा : Assembly Elections 2024 : मोठी बातमी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होणार; निवडणुक आयोगाची ३.३० वाजता पत्रकार परिषद

दरम्यान, जिल्ह्यातील देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे (Saroj Ahire) यांच्या विधानसभा मतदारसंघात (Deolali Assembly Constituency) विविध विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीबाबत वरील भाष्य केले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या