Tuesday, August 25, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, सर्व...

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल, सर्व कार्यक्रम रद्द

मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना प्रकृती बिघडल्याने त्यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. आताच्या घडीला एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सततचा वाढता कामाचा ताण आणि धावपळीमुळे त्यांना तीव्र ताप आणि प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

संपादकीय : ४ जुलै २०२६ – श्रमाचे मोल, की चेष्टा?

काल ठाण्यातील गंगुबाई शिंदे सभागृहात दुपारच्या सुमारास धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार होता. मात्र, एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. यानंतर एकनाथ शिंदे हे तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. सध्या ते रुग्णालयातच असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत ठाकरे सेनेचे ६ खासदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या संपूर्ण प्रक्रियेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सतत दिल्ली आणि मुंबई अशा वाऱ्या कराव्या लागल्या होत्या. या सततच्या प्रवासाचा आणि दगदगीचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. सध्या काळजीचे कोणतेही कारण नसून, त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; भावात वाढ

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5200 रुपयांपर्यंत भाव मिळाला. डाळिंबाला प्रतिकिलोला 200...