Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूज'प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२५' अर्ज करण्यासाठी मुदत वाढ

‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२५’ अर्ज करण्यासाठी मुदत वाढ

नाशिक | प्रतिनिधी

- Advertisement -

केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. अतुलनीय कार्य करणाऱ्या बालकांनी या पुरस्कारांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

ज्या मुलांनी (वय पाच वर्षांपेक्षा अधिक व १८ वर्षांपर्यंत) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नावीण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यांना हा पुरस्कार दिला जातो.

सदरचे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. अशी मुले स्वत: किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश, जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था अर्ज करू शकतात.

अर्जदार बालक हा पूर्वी कोणत्याही श्रेणीतील समान पुरस्काराचा (मंत्रालयाने यापूर्वी प्रदान केलेल्या अपवादात्मक कामगिरीसाठी राष्ट्रीय बाल पुरस्कारासह) पूर्वीचा प्राप्तकर्ता नसावा. नागरिकांनी आपल्या कुटुंबात किंवा बालक असल्यास संबंधित अधिकृत संकेतस्थळावर बालकाचे नामांकन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...