Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय बालकाचा मृत्यू

दुर्दैवी : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय बालकाचा मृत्यू

पाच दिवसांत दुसरी घटना

पंचाळे । वार्ताहर Panchale

- Advertisement -

परिसरात आज दि.१३ सप्टेंबर रोजी सायंकाळी खडांगळी येथे दीड वर्षाच्या बालकावर हल्ला करत बिबट्याने त्याला झोळीतून ओढून नेले. या हल्ल्यात जखमी मुलाचा मृत्यू झाला. गोलू युवराज शिंगाडे असे मृत बालकाचे नाव आहे. पेठ तालुक्यातून शेतीकामासाठी आलेल्या मजुराचे हे बालक आहे.

खडांगळी येथील शेतकरी अर्जुन संपत कोकाटे निमगाव देवपुर शिवारात राहतात त्यांच्या चाळीमध्ये काही कोकणी कामगार राहतात यावेळी कामगार मका कामासाठी शेतामध्ये गेले होते यावेळी बिबट्याने दबा धरून चाळीमध्ये प्रवेश करून झोळीमध्ये मध्ये झोपलेल्या बालकाला २०० मीटर असलेले उसाच्या शेतात उचलून नेले त्यात त्या बालकाचा मृत्यू झाला. गोलूचे पालक पेठ तालुयातील कुंबाळे येथील रहिवासी असून ते मजुरीसाठी खडांगळी शिवारात वास्तव्यास आलेले आहेत. गोलूचे शव नाशिक जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

मागील आठवड्यात रविवारी सात सप्टेंबर रोजी पंचाळे येथील सारंग गणेश थोरात या दहा वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . त्यामुळे वनविभागाने विविध उपाय योजना करून बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. मात्र अद्यापही बिबट्या सापडलेला नाही. बिबट्याच्या हल्ल्यात दुसर्‍या बालकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापही व्यक्त होत असून काही भागात भितीचे वातावरण आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : ​’गट्ट्या’ची हुलकावणी संपली! चोरी प्रकरणातील दोन वर्षांपासून फरार...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik रेकॉर्डवरील पसार संशयितांचा (Suspected) शोध घेण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत नाशिक शहर गुन्हेशाखा (Nashik City Unit) युनिट-२ च्या पथकाने कारवाई...