नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी शनिवारी (२५ जुलै) रोजी बिहारमधील अनेक शहरांत आंदोलन करण्यात आले. यात काही ठिकाणी गोळीबार करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या संबधीत काही व्हिडीओ समोर आले आहे. पोलीस अधीक्षक पुरण कुमार झा यांच्या निर्देशानुसार, गोळीबार करणाऱ्या कॉन्स्टेबल अभिषेक कुमार पटेल यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सीवानमध्ये आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यांनी एक पोलीस एके-४७ ने रायफलने गोळीबार करत असल्याचे आणि इतर ठिकाणीही पोलीस बंदूका घेऊन आंदोलकांच्या मागे पळत असल्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत. बिहारमधील या गोळीबारावरून आता नवा वाद सुरू झाला आहे.
तर राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीलेय की, “देशातील विद्यार्थ्यांविरोधात संपूर्ण व्यवस्था उभी राहिली आहे. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर AK-47 मधून गोळीबार झाला. शेकडो विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांवर कोणताही एफआयआर होणार नाही आणि त्यांची सुटका केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचं काय झाले?”
पुढे त्यांनी म्हंटले की, “दिल्लीत विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा वापर झाला, तर बिहारमध्ये AK-47 वापरण्यात आली. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि दिल्ली अशा विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी सरकारने दडपशाहीचा मार्ग स्वीकारला आहे.”
शैक्षणिक व्यवस्थेवरही निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले, “सरकारमध्ये प्रामाणिकपणे शैक्षणिक सुधारणा करण्याची इच्छाशक्ती दिसत नाही. विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. पंतप्रधान मोदी तुम्ही देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा.”
औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, तक्रारीचा ई-मेल बनावट? MPSC मधून धक्कादायक माहिती समोर
सोशल मीडियावर एक व्हिडीओ असाही व्हायरल होत आहे, ज्यात दोन आंदोलक जखमी अवस्थेत आहेत. त्या दोघांना गोळ्या लागल्याचे ते सांगत आहेत. बिहारमध्ये आंदोलनादरम्यान घडलेल्या या घटनेचे पडसाद दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनातही उमटले आहेत.




