Monday, July 27, 2026
Homeक्राईमNashik Crime News : ​'गट्ट्या'ची हुलकावणी संपली! चोरी प्रकरणातील दोन वर्षांपासून फरार संशयित...

Nashik Crime News : ​’गट्ट्या’ची हुलकावणी संपली! चोरी प्रकरणातील दोन वर्षांपासून फरार संशयित अटकेत

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

रेकॉर्डवरील पसार संशयितांचा (Suspected) शोध घेण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत नाशिक शहर गुन्हेशाखा (Nashik City Unit) युनिट-२ च्या पथकाने कारवाई केली आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात गेल्या दोन वर्षांपासून चोरीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयितास सापळा रचून गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. कृष्णा उर्फ गट्ट्या युवराज पालवे (वय १९, रा. म्हसोबा मंदिराजवळ, भिमवाडी, गंजमाळ, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

- Advertisement -

​मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२४ मध्ये इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) आरोपी कृष्णा पालवे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून तो पोलिसांना चकवा देत फरार होता. त्यामुळे न्यायालयात त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर करण्यात आले होते. दरम्यान, २६ जुलै रोजी गुन्हेशाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे व नंदकुमार नांदुर्डीकर यांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संशयित कृष्णा पालवे हा गंजमाळ पोलीस चौकीच्या मागील परिसरात वावरत आहे.

या माहितीच्या आधारे युनिट-२ चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने गंजमाळ परिसरात (Ganjmal Area) सापळा रचला आणि संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला इंदिरानगर पोलिसांच्या (Police) स्वाधीन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता ‘E20 इंधन’ लक्ष्य; आम आदमी पार्टी आक्रमक,...

0
दिल्ली । Delhi केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता आम आदमी पार्टीने (AAP) केंद्र सरकारच्या २० टक्के एथेनॉल...