Friday, May 3, 2024
Homeधुळेन्याय मिळण्यापुर्वीच उपोषणकर्ता वृध्दाचा मृत्यू

न्याय मिळण्यापुर्वीच उपोषणकर्ता वृध्दाचा मृत्यू

धुळे । Dhule। प्रतिनिधी

कौटुंबिक वादातून (Family disputes) अन्याय होत असल्याने दोषींवर कारवाई (Action) करावी, या मागणीसाठी उपोषणाला (Fasting) बसलेेल्या वृध्दाचा (old man) न्याय मिळण्यापुर्वीच रात्री मृत्यू (Death) झाला. त्यामुळे नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. हिरे वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

- Advertisement -

सुधन्वा विठ्ठल भदाणे (Sudhanva Vitthal Bhadane) (वय 70 रा. दुसाणे ता. साक्री) असे मयत वृध्दाचे नाव आहे. कौटुंबिक कारणावरून (Family disputes) अन्याय केला जात असून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी सुधन्वा व त्यांची पत्नी रंजना (वय 65) हे दाम्पत्य क्युमाईन क्लबजवळ उपोषण (Fasting) करत होते. दरम्यान तीन दिवसांपूर्वी सुधन्वा भदाणे यांची प्रकृती बिघडली. त्यांना हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू (Treatment continues) असताना रविवारी रात्री त्यांचा मृत्यू(Death) झाला. त्यानंतर भदाणे यांचे कुटुंबीय व नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली. प्रशासनाने (administration) वेळीच दखल घेतली असती तर भदाणे यांचा प्राण गेला नसता, असे नातलगांचे म्हणणे होते. पोलिसांनी नातलगांची समजूत काढली. मृत भदाणे यांच्यावर आज दुपारी शवविच्छेदन करण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या