दिंडोरी | प्रतिनिधी Dindori
- Advertisement -
गांडोळे येथील शासकीय आश्रमशाळेत शिकणार्या पंधरा वर्षीय विद्यार्थिनीचा शाळेची प्रार्थना सुरु असताना चक्कर येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली.
गांडोळे आश्रमशाळेत गेल्याच महिन्यात नववीत प्रवेश घेतलेली विद्यार्थिनी माया संदीप भोये (१५) रा. टेंटमाळ) ही सकाळी शाळेत आली. प्रार्थना सुरु असताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडली.
तिला शिक्षकांनी ननाशी आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र तेथे डॉटरांनी तिला मृत घोषित केले. पेठ पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली.




